घाटनांदुर येथे आयएमए व AMPA अंबाजोगाई यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न
घाटनांदुर येथे आयएमए व AMPA अंबाजोगाई यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न
*अंबाजोगाई/ प्रतिनिधी*
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आय.एम.ए अंबाजोगाई, ॲम्पा अंबाजोगाईच्या व तालुका वैध्यकीय कार्यालय, अंबाजोगाई, यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र घाटनांदुर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.या शिबिराचा घाटनांदुर व पंचक्रोशीतील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांनी दिली.
आय.एम.ए. अंबाजोगाई च्या वतीने दरवर्षी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन केले जाते. ज्याचा लाभ तळागाळातील रुग्णांना झाला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने रविवार दि.6 एप्रिल रोजी घाटनांदुर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन आयएमए अंबाजोगाई व ॲम्पा अंबाजोगाईच्या वतीने आयोजन करण्यात आले. यावेळी घाटनांदुर व पंचक्रोशीतील असंख्य गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांनी याचा लाभ घेतला. या महा आरोग्य शिबिरात हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, पॅरालिसीस, महिलांचे आजार, लहान बालकांचे आजार, अस्थिविकार आदी आजारांवर उपचार करण्यात आले. या शिबिरात ३०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. हें शिबीर राज्य आय एम ए च्या संस्कृतीक समितीचे चे चेअरमन प्रसिद्ध मानसऊपचार तज्ज्ञ डॉ राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई आयएमए चे अध्यक्ष डॉ नवनाथ घुगे म्हणाले की, जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शहरातील नामांकित व तज्ञ डॉक्टरांची सेवा घाटनांदुर आणि पंचक्रोशीतील रुग्णांना देण्याचे भाग्य आम्हास लाभले.आयएमए असेल किंवा अँपा अंबाजोगाई असेल या सर्व संघटना सामाजिक भान राखून काम करणाऱ्या संस्था आहेत. सातत्याने ठिकठिकाणी वेगवेगळ्या निमित्ताने अशा शिबिरांचे आयोजन करून त्याचा लाभ विविध घटकांना मिळाला पाहिजे हा आमचा प्रामाणिक हेतू असल्याचे डॉ .नवनाथ घुगे यांनी सांगितले.या शिबिराच्या आयोजनासाठी आयएमएचे अध्यक्ष डॉ .नवनाथ घुगे, सचिव डॉ.उद्धव शिंदे, उपाध्यक्ष डॉ राहुल धाकडे, उपाध्यक्ष डॉ विजय लाड, कोषाध्यक्ष डॉ. विनोद जोशी, डॉ.नितीन चाटे, सहसचिव डॉ. अतुल शिंदे, डॉ. सचिन पोतदार, डॉ. अरुणाताई केंद्रे, डॉ. सारिकाताई शिंदे, डॉ निलेश तोषनिवाल, डॉ अनिल मस्के, डॉ बळीराम मुंडे, डॉ शिवराज पेस्टे, डॉ संदीप जोगदंड, अँपाच्या अध्यक्ष डॉ. सुलभाताई पाटील,डॉ. नाकाडे, डॉ.लक्ष्मीकांत कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गायकवाड, डॉ. पाटील, डॉ. ऋषिकेश घुले, डॉ माळवे, डॉ श्रीकांत मुंडे, डॉ हनुमंत चोरमले, प्राथमिक आरोग्य केंद्र घाटनांदुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाथरकर मॅडम व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळाल्याबद्दल ग्रामीण भागातील रुग्णांनी आयएमआय अंबाजोगाई व अँपाचे आभार व्यक्त केले.
