Monday, April 7, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

दोन-तीन वर्षापासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आज्जीचे वृद्धापकाळाने निधन, आईचं दूध पिलेल्या आठ मुली समोरून अंत्ययात्रा गेली मात्र एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे नाही आली….. 

दोन-तीन वर्षापासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आज्जीचे वृद्धापकाळाने निधन, आईचं दूध पिलेल्या आठ मुली समोरून अंत्ययात्रा गेली मात्र एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे नाही आली….. 

 

लातूर (प्रतिनिधी)
   आठ मुली असतानाही आईच्या दुधाचे सुद्धा उपकार या आठ मुलींनी ठेवले नाहीत, पर्यायाने या आईला दोन-तीन वर्षापासून वृद्धाश्रमात राहव लागलं आणि अखेर वृद्धापकाळाने या आजीच दुःखद  निधन झालं, या आठ मुलींच्या समोरून आईची अंत्ययात्रा गेली मात्र एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे नाही आली, हे वास्तव आहे एका आजीच्या नशिबी आलेलं.
     दोन-तीन वर्षापासून प्रार्थना फाउंडेशन च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात राहत असलेल्या आज्जीचे वृद्धापकाळाने निधन झाले, आणि त्यांच्या निधना नंतर ज्या वेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा आईच्या दुधाचे सुद्धा उपकार या आठ मुलींनी ठेवले नाहीत याचे वास्तव समोर आणले ते प्रार्थना फाउंडेशनच्या टीमने
      या टीमने केलेले पुण्य कर्म आणि त्या नंतर पोस्टच्या माध्यमातून समोर आणलेले वास्तव यामुळे प्रत्येकाचे डोळे पानावल्या शिवाय राहणार नाहीत म्हणून ती पोस्ट आपल्या पर्यंत पोचवण्याचा प्रपंच.
आठ मुलींच्या समोरून आईची मयत गेली एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे नाही आली….. *
     *आईच्या दुधाचे सुद्धा उपकार ठेवले नाहीत…..*
     *दोन-तीन वर्षापासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आज्जीचे वृद्धापकाळाने निधन…..*
      आज्जीला आठ मुली, वडिलांचं निधन झाल्यावर आईला कोण सांभाळणार यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले. वडिलांची इस्टेट मात्र सर्वांनी ओरबाडून खाल्ली, नऊ दहा एकर जमीन हडप केली, पैसा आडका सर्व संपवला पण आईला सांभाळायला कोणी तयार नाही…..
       वडवळ येथे राहणाऱ्या एका मुलीने आज्जीचा बऱ्याच दिवस सांभाळ केला असं आज्जी मला सांगायच्या, मग इस्टेट वाटाघाटी मध्ये ज्याने जास्त इस्टेट खाल्ली त्याने सांभाळ करा म्हणत आठ मुलींपैकी एक ही मुलगी आईला सांभाळायला तयार झाली नाही.जीन नऊ महिने पोटात वाढवलं,जन्म दिला, सांभाळल, लहानाच मोठ केलं, संसार उभा करून दिले त्या आईला सांभाळायला कोणी तयार नाही.*
    *लाजकाज कसतरी आठ बहिणींनी एक एक महिना आईला सांभाळू अस ठरवलं, आईच्या वाटण्या करून घेतल्या, आईला सांभाळायला पाळ्या लावल्या. त्यात ही तिचे खूप हाल केले कालांतराने आज्जीला ऎकायला व दिसायला कमी येऊ लागलं. मग आई जाच वाटू लागली.जावयांनी सुद्धा तोंड दाबून मारायचं, जेवायला द्यायच नाही, घराच्या बाहेर काडायचं असे हाल केले, या सर्व गोष्टी आज्जी अनु व मला सांगायच्या.*
    *मग वरवर आईला सांभाळायला कोणीच तयार होईना.मग मोठ्या मुलीने आईला कोणीही सांभाळायला तयार नाही म्हणून मंदिरात नेहून सोडलं….. ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारीच घटना म्हणावी लागेल.*
       *मग काही कालांतराने आज्जीला आपल्या प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. दोन-तीन वर्षे मी आणि अनुने आज्जीचा सांभाळ अगदी नातवासारखा केला. आज्जीला दिसत नव्ह ऐकायला येत नव्हतं पण मी आणि अनुने फक्त हात लावला की त्या आम्हाला ओळखायच्या आणि आम्हाला बोलत बसायच्या.*
   *काल दुर्दैवाने आज्जीने शेवटचा श्वास घेतला.आज्जी गेल्या हे कळल्यावर त्यांच्या आठ ही मुलींना, जावयाला, सख्या भावाला निरोप कळवले,त्यांच्या नातवांना ही कळवले,त्यांचे दोन नातू तर पोलीस मध्ये आहेत, एका नाताने तर ज्यान सोडलं त्याला सांग माझं काय संबंध म्हणून मलाच शिव्या हासडल्या.*
   *सर्व मुली आश्रमावर आल्या (मला वाटल आपुलकीने आल्या असतील, आईच्या शेवटच्या विधी करायला आल्या आतील पण…..) फुकटची रडारडी सुरू झाली. मी आणि अनुने त्या सर्वांना विचारलं की आत्ता पुढे कसं करायचं कोण अंत्यविधी करणार, कोण मृतदेह घेऊन जाणार हे विचारल्यावर एक एक मुलगी तिथून निघायला लागली, कोणी ही अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना. निम्या मुली निघून गेल्या, राहिलेल्या ही तयार होईना, जबाबदारी घेणार कोण यावरून एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला तयार झाली नाही. शेवटी बाबदारी म्हणून, संस्था म्हणून आम्हीच अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्यादेखत आम्ही आज्जीची मयत घेऊन सोलापूरला आलो रीतसर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशान भूमीत पार पाडला पण एक ही मुलगी, जावई, सख्खा भाऊ, नातू कोणी ही आमच्या सोबत आले नाहीत…..*
   *आठ मुली, जावई, नातू, सख्खा भाऊ असून सुद्धा आज्जीचा शेवट असा व्हावा ही दुर्दैवी गोष्ट आहे. आजीचा सांभाळ केल्याने आजीसोबत एक चांगलं नातं घट्ट झाल होत, लळा लागला होता मला, शेवटी रडू आवरलं नाही आणि ढसाढसा डोळ्यातून पाणी यायला लागलं……*
– *टीम प्रार्थना फाऊंडेशन*
*9545992026/9049063829*
▪️▪️▪️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!