Skip to content
आ.सौ.नमिता मुंदडाच्या बंगल्यावर भाजपा स्थापना उत्सव साजरा
जनतेला दिलेले आश्वासन पुर्ण करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी-डॉ.शरदराव हेबाळकर

————————————————————————————————
अंबाजोगाई(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या आई निवासस्थानी विविध कार्यक्रम संपन्न झाले. ध्वजारोहण, कारसेवकांचा सत्कार, जेष्ठांचा सन्मान, मोटार सायकल रॅली आदी उपक्रम जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. दरम्यान स्थापना दिना निमित्त बोलताना डॉ.शरदराव हेबाळकर यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे लोकांना दिलेले आश्वासन पुर्ण करणारा पक्ष, ज्यांनी राष्ट्र मंदिर बांधण्याचा केलेला संकल्प राम मंदिर उभा करूनच दाखवला. 370 कलम बाजुला करून राष्ट्रभक्तीची ज्योत याच पक्षाने पेटवली. महापूरूषांच्या बलिदानापासुन स्थापन झालेला पक्ष म्हणजे भाजपा हे त्यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनीही भाजपाच्या ऐतिहासिक वाटचालीची आणि सद्यस्थितीतल्या सुवर्णकाळाची ओळख कार्यकर्त्यांना करून दिली.
महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर शहरातल्या ज्यांनी 1992 ला कारसेवा केली, त्यांचा सत्कार आमदाराच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देवुन केला. सौ.शरयुताई हेबाळकर, प्रकाशराव जोशी, कल्याणी जोशी, उन्मेष माथेकर, दामोदर राऊत, रमाकांत सेलमोहकर, विनय जहागिरदार, आप्पाराव यादव, जेष्ठ पत्रकार हणुमंत पोखरकर, मुळे मॅडम, जयंत हमिने आदींचा समावेश होता तर पक्षाचे जेष्ठ नेते कांतीलाल केंद्रे, मामा रेणापुरे, नारायणरावजी केंद्रे, भास्करराव धर्मपात्रे, मोहनराव कराड, शामराव औसेकर, शशीकांत गायकवाड, डॉ.सुधीर धर्मपात्रे,माजी नगराध्यक्ष महादेव मस्के, सभापती काजगुंडे, अॅड.शरदराव इंगळे, अनंतराव आडसुळ आदीसह इतरांचाही सन्मान बैठकीत करण्यात आला. जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी कारसेवा करताना 1992 साली झाशी येथे तब्बल तेरा दिवस या सर्व सहकार्यांना सोबत घेवुन जेलची सजा भोगली. त्याचे अनुभव कथन त्यांनी केले. अगदीच म्हटलं तर जेलमध्ये आम्ही सारे पेपर टाकुन झोपायचो. अन्नपाणीही पोलीसांनी खावु दिलं नव्हतं. स्व.प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, विमलताई मुंदडा आदींच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. या मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातुन काम करताना मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खा. प्रितमताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांना सोबत घेवुन काम करतो. माणसं जोडणं आणि एकत्रित रहाणं ही खर्या अर्थाने आता काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कांतीलाल दादा केंद्रे यांनी जुन्या काळातील अनुभव सांगताना वर्तमान भाजप पक्षाला आलेले चांगले दिवस आणि या काळात असलेले कार्यकर्ते खरे भाग्यवान असल्याचे सांगितले. प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी भाजपा हा संस्कार आणि व्यक्तिमत्व घडवणारा पक्ष असुन जबाबदारी आणि कर्तव्य जाण ओळखुन कार्यकर्ता काम करतो. पक्षात काम करताना निष्ठा अत्यंत महत्वाची असुन जनसंघाच्या स्थापनेपासुन पक्षाची झालेली वाटचाल आणि राज्यात पक्ष वाढीसाठी स्व.गोपीनाथराव मुंडेंचे असलेले योगदान याची ओळख त्यांनी करून दिली.

अध्यक्षीय समारोप करताना शरदराव हेबाळकर म्हणाले की, राजकिय व्यवस्थेत भाजपा म्हणजे लोकांना दिलेले आश्वासन पुर्ण करणारा पक्ष अशी त्याची ओळख. ज्या पक्षाने स्थापन होताना 370 कलम बाजुला करू, प्रभु रामचंद्रांचं मंदिर बांधु हे सांगितलं ते पुर्ण करायला आजचा दिवस उजाडला. प्रकाश बोरगावकरांनी सुत्रसंचालन केले. अनंतराव आडसुळ त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्सव घडवुन आणल्याचं कौतुक मुंदडांनी केले.
Post Views: 221
error: Content is protected !!