गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मोबाइल बीडमध्ये गायब, केज पोलिसांत तक्रार दाखल
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मोबाइल बीडमध्ये गायब, केज पोलिसांत तक्रार दाखल
बीड
गृहराज्यमंत्री मा ना योगेश कदम हे बीड दौऱ्यावर आले आसता या दौऱ्यादरम्यान त्यांचा मोबाईल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
शुक्रवारी योगेश कदम यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित असताना त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला. योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याचं समजताच सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईलच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार, असा सवा विरोधकांनी उपस्थित केला आहे.
दौऱ्यावेळी कॅमेऱ्यासमोरच मोबाईल गायब झाला, त्यामुळे बीड प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोबाईल हरवला की चोरीला गेला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. ही घटना सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आली आहे. या प्रकरणाचा लवकरच छडा लागावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. तर बीडमधील विरोधकांनी सरकारला सुरक्षेच्या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे.
