बीड पोलीस अॅक्शन मोडमध्ये, मोहन मुंडेवर एम पी डी ए नुसार कार्यवाही गावगुंडांना भरली धडकी
बीड पोलीस अॅक्शन मोडमध्ये, मोहन मुंडेवर एम पी डी ए नुसार कार्यवाही गावगुंडांना भरली धडकी
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले असुन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी बीड पोलिसांकडून काळजी घेतली जात आसतानाच आंबजोगाई येथील कुख्यात दरोडेखोर मोहन मुंडे याच्यावर एम पी डी ए नुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून घेत प्रतिबंधात्मक कारवाया करून यापुढे गुन्हे केल्यास तडीपार, एमपीडीए, मकोकासाख्या गुन्ह्याची तंबी दिली जात आहे. याअगोदर वाळू माफियांसह गुंडांना बोलावून घेत परेड घेतली होती. शांतता ठेवा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हरसुल कारागृहात केलीय.
अंबाजोगाई येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या मोहन दौलत मुंडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी 4 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हा प्रस्ताव पारित करून याबाबतचे आदेश दिले आहे.
मोहन मुंडेंवर सात गंभीर गुन्हे
मोहन मुंडे याच्यावर परळीसह इतर विविध ठिकाणी एकूण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बरेच दिवसांपासून पोलीस प्रशासनाची नजर होती. अखेर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मुंडेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे गावगुंडांचे मात्र धाबे दणाणले आले आहेत.
आरोपींना तंबी
बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत अॅक्शन मोडवर आल्याचे पाहावयास मिळाले आहे. हत्येचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल दीडशे आरोपींना तंबी देण्यात आली आहे. गुन्हे करू नका, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी समज दिली.
