प्रा.ईश्वर मुंडे यांनी घेतले स्व.विमलताई मुंदडा यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन
प्रा.ईश्वर मुंडे यांनी घेतले स्व.विमलताई मुंदडा यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन
अंबाजोगाई दि.२२(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री स्व.विमलताई मुंदडा यांच्या स्मृतीदिनी चनई,अंबाजोगाई येथील स्मृती स्थळावर जाऊन प्रा.ईश्वर मुंडे यांनी आज दर्शन घेऊन विनंम्र अभिवादन केले.
या वेळी बोलताना प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की,स्व.विमलताई मुंदडा या माझ्या राजकारणातील बालवाडीच्या शिक्षिका होत्या.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब व मुंदडा कुटुंबीय एकत्र आसताना वयाच्या १६ व्या वर्षा पासून मी स्व.विमलताई मुंदडा व नंदकिशोर मुंदडा(काकाजी) यांच्या संपर्कात आलो.समाजकारण व राजकारणाचे बाळकडू या उभयतांकडूनच मिळाले तसेच शैक्षणिक क्षेत्र,समाजकारण व राजकारणात पद- प्रतिष्ठा मिळाली.
पुढे मतदार संघ व पक्ष बदल झाले परंतू ह्रदयाच्या एका कोपऱ्यात मुंदडा कुटुंबीयाचे स्थान कायम आहे.याची उतराई म्हणून आज २२ मार्च २०२५ रोजी स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले.
या मुळे सकारात्मक समाजकारण व राजकारणाची उर्जा मिळाली.
