ताज्या घडामोडी

हिंजवडी हत्याकांडाचा क्रूर कर्मा, काय तर म्हणे “जेवणाचा डबा खाऊ दिला नाही, दिवाळीचा पगार कापला” हरामखोर चालकाने चार जणांना जाळून मारल 

हिंजवडी हत्याकांडाचा क्रूर कर्मा, काय तर म्हणे “जेवणाचा डबा खाऊ दिला नाही, दिवाळीचा पगार कापला” हरामखोर चालकाने चार जणांना जाळून मारल 

पुणे (प्रतिनिधी)

    हिंजवडीमध्ये मिनी बसला आग लागली, आणि यात चार जणांना जळून मृत्यू झाला  अपघाताचा बनाव असलेल्या या घटनेत पोलिसांच्या कसून चौकशीनंतर क्रूर कर्मा असलेल्या चालकानेच चौघांना जाळून मारल्याचं समोर आलं आहे.

   विशेष म्हणजे चालकाचा ज्या लोकांवर रोष होता, ते या घटनेतून बचावले आणि दुसऱ्याच चार जणांचा मृत्यू झाला असून मिनि बस चालक जनार्धन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये जे सांगितलं ते चीड आणणारं आहे. किरकोळ कारणावरुन त्याने गाडी पेटवून दिली. घटनेनंतर पोलिसांना चालकाचा संशय आलाच होता. त्याची कसून चौकशी केली असता यामागचं कारण समोर आलेलं आहे. गुरुवार, दि. २० मार्च रोजी पोलिसांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हिंजवडी हत्याकांडाबाबत माहिती दिली.

चालकाला कशाचा राग होता?

१. कंपनीतील काही कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून मिळणारी चुकीची वागणूक आणि त्यामुळे मनामध्ये रोष निर्माण झाला.

२. कंपनी व्यवस्थापनाने दिवाळीत पगार कापला होता.

३. चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची, हिडीस-फिडीस केले जायचे.

४. मागच्या आठवड्यात जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नाही.

या कारणांमुळे चालक हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता. त्यांचा बदला घेण्याच्या सुडातून त्याने हे कटकारस्थान रचले होते. परंतु या घटनेत ज्या चार जणांचा बळी गेला, त्यांच्यावर चालकाच रागच नव्हता. ज्यांच्यावर राग होता ते गाडीच्या बाहेर पडले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

मिनी बसचालक जनार्दन हंबर्डेकर (वय ५६, रा. वारजे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या हिंजवडी पोलिस ठाण्यात सुरु आहे. गुरुवारी (ता. २०) परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड व वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. घटना घडल्यापासूनच हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात तसेच अधिकारी फौजदार दत्ता काळे यांना चालक हंबर्डेकर याच्यावर संशय होता त्यानुसार मिनी बसमधील प्रत्यक्षदर्शी आणि इतर जखमींचे जाब जबाब पोलिसांनी नोंदवले.

यांचा नाहक जीव गेला

हिंजवली जळीतकांडात ज्यांच्यावर चालकाचा रोष होता ते सुदैवाने या दुर्घटनेतून बचावले असून गंभीर भाजले आहेत. मात्र ज्यांचा याच्याशी काहीही संबंध ते मृत पावले हाते. मृतांमध्ये सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (वय ५८, रा. नऱ्हे), गुरूदास लोकरे (वय ४०, रा. हनुमान नगर, कोथरूड), राजू चव्हाण (वय ४०, वडगाव धायरी) यांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!