अहिल्यानगर – बीड- परळी व धाराशिव -बीड- संभाजीनगर या दोन रेल्वे मार्गाच्या आर्थिक तरतूदी साठी आवाज उठवणाऱ्या खा. बजरंग सोनवणे यांना घाटनांदूर – अंबाजोगाई -केज – पाटोदा – श्रीगोंदा रेल्वे मार्गाचा विसर का ?
अहिल्यानगर – बीड- परळी व धाराशिव -बीड- संभाजीनगर या दोन रेल्वे मार्गाच्या आर्थिक तरतूदी साठी आवाज उठवणाऱ्या खा. बजरंग सोनवणे यांना घाटनांदूर – अंबाजोगाई -केज – पाटोदा – श्रीगोंदा रेल्वे मार्गाचा विसर का ?
अंबाजोगाई (दत्तात्रय अंबेकर)
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी लोकसभे मध्ये रेल्वे विषयी भाषन ठोकताना अहिल्यानगर – बीड- परळी व धाराशिव -बीड- संभाजीनगर या दोन रेल्वे मार्गाच्या आर्थिक तरतूदी सह रेल्वे सुविधा संदर्भात मुद्दे मांडले मात्र गेली 40 वर्षा पासून मागणी असलेल्या, सर्वेक्षण झालेल्या, आर्थिक दृष्ठया फायदेशीर असलेल्या आणि स्वतःच्या केज गावाहून जाणाऱ्या घाटनांदूर – अंबाजोगाई -केज – पाटोदा – श्रीगोंदा या रेल्वे मार्गा संदर्भात एक चकार शब्द ही काढला नाही त्यांना या मार्गाचा विसर का पडला आहे या बद्दल आश्वर्य व्यक्त होत आहे.
मागील अनेक वर्षा पासून प्रस्तावित असलेल्या घाटनांदूर – श्रीगोंदा या अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा मार्गे अहिल्या देवी नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला गती मिळण्या साठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे व अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी विशेष प्रयत्न केल्यास हा प्रलंबित प्रश्न निश्चित मार्गी लागणार आसून हा प्रकल्प दोन्ही जिल्ह्याच्या विकासासह दळणवळणाच्या व रेल्वे खात्याला आर्थिक उत्पन्न देणारा ठरणार आहे.
मागील अनेक वर्षा पासून घाटनांदूर-श्रीगोंदा या रेल्वे मार्गासाठी या पंचक्रोशीतील लोक आग्रही असून या रेल्वे मार्गाच्या मागणी साठी भाजपचे एकमेव निष्ठावंत कार्यकर्ते भारत पसारकर यांनी अनेक वेळा स्वतःच्या हस्ताक्षरात केंद्र सरकार कडे पाठपुरावा केलेला असून माजी खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या कडे अंबाजोगाई जनाग्रह रेल्वे संघर्ष समितीने ही पाठपुरावा केलेला आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण व्हावा यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अनुकूल होते. या रेल्वेमार्गामुळे अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा, जामखेड या सह अनेक गावे रेल्वेमार्गावर येणार असून २६५ किमी अंतराचा मार्ग पूर्ण झाला तर या परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे होणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सन २०१५ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घाटनांदूर (जि. बीड) ते श्रीगोंदा (जि.अहमदनगर) हा नवीन रेल्वेमार्ग जाहीर करून या मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी ३४ लाख रुपयांची तरतूद जाहीर केली होती. त्यानुसार पुढील आठ महिन्यांच्या कालावधीत सन २०१६ मध्ये रेल्वे प्रशासनाने या नियोजित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम घाटनांदूर रेल्वेस्थानकातून सुरू केले. घाटनांदूर व अंबाजोगाई शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात खुंटे रोवण्यात आले होते.
प्रशासनाची ही सतर्कता पाहिल्याने नागरिकांना हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे वाटत होते. मात्र, पुढे हे काम रखडले ते आतापर्यंत रखडलेले आहे. घाटनांदूर, अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव, केज, नेकनूर, मांजरसुंबा, लिंबागणेश, पाटोदा, जामखेड, दौंड किंवा श्रीगोंदा रोड असा हा मार्ग तेव्हा प्रस्तावित करण्यात आला होता. हा रेल्वेमार्ग बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या विकासाची पर्वणी ठरून आर्थिक सुबत्ता आणणारा ठरू शकतो. बीड जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीस लागावेत व जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, केज हे तालुके रेल्वेमार्गाने जोडले जावेत या उद्देशाने या रेल्वेमार्गाची मागणी पूर्णत्वाकडे जाणार आहे. परंतु हा रेल्वेमार्ग परळी-अंबाजोगाई-केज-नेकनूर-मां जरसुंबा-पाटोदा जामखेड-अहमदनगर ही अधिक प्रवासी अधिभार देणारी गावे वगळून कमी अधिभार देणाऱ्या परळी-तेलगाव-वडवणी-बीड-अहमदनगर अशा प्रकारे बनवण्यात येत आहे. त्यामुळे आता सन २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे घाटनांदूर ते श्रीगोंदा या रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
घाटनांदूर ते श्रीगोंदा हे अंदाजे २६५ किलोमीटर अंतर आहे. या मार्गावर प्रमुख वीस गावांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार पुलांची संख्या असून या रेल्वेमार्गाचा केंद्र सरकारकडून सर्व्हे झालेला आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास न्यायचा असेल तर जनरेट्याबरोबरच राजकीय इच्छा प्रबळ असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांनी या मार्गासाठी जे प्रयत्न करायला हवे होते ते केले नाहीत त्यामुळे या मार्गाला गती मिळालेली नाही
*रेल्वे मार्ग तीर्थ क्षेत्राला जोडणारा आसल्याने भाविकांच्या सोयीचा*
मराठवाडा ही साधू संतांची, स्वातंत्र्यवीरांची भूमी आसून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुबंई, पुणे व कोकणातील लोकांना प्रभू वैद्यनाथ, योगेश्वरी, चाकरवाडी, कपिलधार, राशीनची देवी आदी तीर्थ क्षेत्राच्या दर्शनासाठी येण्यास सोयीचे होणार आसून हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक, पत्रकार इत्यादींनी मतभेद बाजूला ठेवून संबंधित मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला तरच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होईल अन्यथा विकासा पासून आपण कोसो दूर राहनार आहेत.
खा. बजरंग सोनवणे यांना घाटनांदूर – अंबाजोगाई -केज – पाटोदा – श्रीगोंदा या रेल्वे मार्गाचा विसर का?
हा मार्गे बीडचे खासदार बजरंग सोनवणे राहिवासी असलेल्या केज शहरातून अहिल्या नगर जिल्ह्यातून जाणारा असल्याने खा. सोनवणे यांनी व अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी स्वतःच्या प्रतिष्ठे साठी लोकसभेत आवाज उठवून व बजेट सत्रात भरघोस निधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता होती व याला सकारात्मक प्रतिसाद देऊन परळीचे आमदार धनंजय मुंडे, भाजप नेत्या व आ पंकजाताई मुंडे, केजच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश अण्णा धस, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार या सर्वांनी विषेश प्रयत्न केल्यास हा प्रलंबित प्रश्न निश्चित मार्गी लावायला हवा.
मात्र बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी 2 दिवसा पूर्वी लोकसभे मध्ये रेल्वे विषयी भाषन ठोकताना अहिल्यानगर – बीड- परळी व धाराशिव -बीड- संभाजीनगर या दोन रेल्वे मार्गाच्या आर्थिक तरतूदी सह रेल्वे सुविधा संदर्भात मुद्दे मांडले, या शिवाय सोनवणे या दोन्ही मार्गासाठी सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, त्याचा पाठपुरावा करत आहेत. विकासाच्या दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न सुरु आहेत त्या बद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल यात तिळमात्र हीं शंका नाही. मात्र गेली 40 वर्षा पासून मागणी असलेल्या, सर्वेक्षण झालेल्या, आर्थिक दृष्ठ्या फायदेशीर ठरणाऱ्या आणि स्वतःच्या गावाहून जाणाऱ्या घाटनांदूर – अंबाजोगाई -केज – पाटोदा – श्रीगोंदा या रेल्वे मार्गा संदर्भात खा. सोनवणे यांनी लोकसभेत एक चकार शब्द ही काढला नाही त्यांना या मार्गाचा विसर का पडला आहे या बद्दल आश्वर्य व्यक्त होत आहे.
Post Views: 171