राजर्षी शाहू असोसिएशन व ढगेज् क्लासेसचे आदर्श पुरस्कार जाहीर प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार वितरण
राजर्षी शाहू असोसिएशन व ढगेज् क्लासेसचे आदर्श पुरस्कार जाहीर
प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार वितरण
अंबाजोगाई(प्रतिनिधी) मातीतल्या माणसा कडून मातीतल्या माणसासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी प्रति वर्षाप्रमाणे राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या वतीने दिले जाणारे ‘आदर्श पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत त्याचे वितरण दिनांक २३ मार्च २०२५ रविवार रोजी प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ. विठ्ठलराव लहाने व सुप्रसिद्ध अभिनेते सुनिल गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे.
राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना प्रतिवर्षी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संकुलात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात येणार आहे
आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात आदर्श शिक्षक, समाजरक्षक, उद्योजक, पत्रकार आणि समाजसेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रतिभावंत व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यावर्षीचा आदर्श समाजसेवक पुरस्कार श्री संतोष अच्युतराव पवार,आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती रंजना नाथराव जाधव, आदर्श समाजरक्षक पुरस्कार श्री मंगेश मारुती भोले,झिरो टू हिरो उद्योजकरत्न पुरस्कार श्री नरहरी राजेंद्र तपकिरे, आदर्श पत्रकार पुरस्कार श्री गोविंद राजाराम जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ. विठ्ठलराव लहाने व महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मा.सुनील गोडबोले आवर्जून उपस्थित राहणार आहेत,त्याप्रसंगी प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे व्याख्यान होणार आहे तसेच पुरस्कारार्थींच्या प्रेरणादायी कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे. समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मनोहर अंबानगरितील सुजाण,सुसंकृत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सोपानराव ढगे , उपाध्यक्ष जी.डी. बनसोडे तसेच सचिव मिलिंद ढगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
