ताज्या घडामोडी

निलंगा , मुरुड आणि केज याठिकाणी होणार पिपल्स बँकेच्या नवीन शाखा

रिझर्व्ह बँके कडून अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस नवीन तीन शाखांना परवानगी

निलंगा , मुरुड आणि केज याठिकाणी होणार पिपल्स बँकेच्या नवीन शाखा

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस रिझर्व्ह बँकेच्या वतीने नवीन तीन शाखा कार्यान्वित करण्यास परवानगी दिल्याचे पत्र नुकतेच रिझर्व्ह बँकेकडून अंबाजोगाई पिपल्स बँकेस प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी दिली आहे. यावेळी बँकेचे संचालक प्रा वसंत चव्हाण,ऍड विष्णूपंत सोळंके, अरुण काळे, पुरुषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ऍड सुधाकर कऱ्हाड, संकेत मोदी, शेख दगडू भाई दावल, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे , प्रा वनमाला रेड्डी,सौ स्नेहा हिवरेकर, लक्ष्मण दासूद, सचिन बेंबडे हे उपस्थित होते. १९९६ साली अंबाजोगाई शहरातील व्यापारी तथा नागरिकांची निकड लक्षात घेऊनन अल्पशा भांडवलावर अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची स्थापना करण्यात आली होती. आज जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षात बँक ५३७ कोटीच्या ठेवी १९ कोटींच्या भांडवलावर २० शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
सप्टेंबर २०२४ अखेर बँकेचे वसूल भागभांडवल हे रू १८ कोटी आहे. बँकेचा स्वनिधी हा रुपये ४७ कोटी आहे. राखीव निधी हा १४ कोटी लाख रुपये एवढा आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमास आधीन राहून ग्राहकांना रु.३२८ कोटी एवढा कर्ज पुरवठा केला असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. सप्टेंबर २०२४ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु २४३ कोटी एवढी आहे. मागील वर्ष अखेरीस बँकेस करपसच्यात ४ कोटी २० लाखांचा नफा होऊन ०% एन पी ए मिळवला असून लेखा परीक्षण अहवालात प्रतिवर्षी बँकेस “अ” दर्जा प्राप्त होत आहे. बँकेची ही उंच भरारी पाहता बँकेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच कर्जदार , ठेवीदार व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
अंबाजोगाई पिपल्स बँक ही आज वीस शाखांच्या द्वारे ग्राहकांना सेवा पुरवीत आहे . नुकत्याच आणखी दोन नवीन शाखां रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार अंबाजोगाई (चौसाळकर कॉलनी) व छत्रपती संभाजी नगर (सातारा परिसर) येथे सुरू केल्या आहेत. यापुढे पुणे (पिंपरी चिंचवड) व मुंबई याठिकाणी सुद्धा बँकेच्या शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. बँकेने ITक्षेत्रात देखील ग्राहकांना तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे. डिजिटल बँकिंग च्या माध्यमातून UPI, IMPS, RTGS , ATM द्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील असल्याने मोदी यांनी यावेळी नमूद केले. बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची ही पावतीच असल्याचे राजकिशोर मोदी यांनी स्पष्ट केले.
मागील काळात अनेक आर्थिक संस्था डबघाईला येऊन दिवाळखोरी मध्ये निघाल्या. अनेक ठेवीदारांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. मात्र अशाही परिस्थितीत अंबाजोगाई पिपल्स बँक ग्राहक ठेवीदार व सभासदांच्या विश्वासाच्या बळावर ताठ मानेने आपला डोलारा पुढे नेत असल्याचा अभिमान संस्थापक राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर देखील कर्जधारक ग्राहकांचा विचार करुन बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले. बँकेचे माननिय सभासद, ग्राहक यांचा विश्वास, बँकेचे संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदाचे नियोजनबध्द कामकाज यामुळे बँक दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचे दिसून येत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी नमूद केले .
अंबाजोगाई पिपल्स बँक केवळ अर्थकारणच न करता वेळोवेळी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले असते. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान , रक्तदान शिबीर , कोरोना योध्दा सन्मान, बँकिंग क्षेत्रात महिला जनजागृती अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे व ग्राहकांसाठीच्या नवनवीन उपक्रमामुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली आहे. यापुढेही अर्थकारणासोबतच वारंवार असेच सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतील असा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!