पोहण्यासाठी उतरलेल्या सहा पैकी पाच तरूणांचा बुडून दुर्देवी मृत्यू, पाचही तरूणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
पोहण्यासाठी उतरलेल्या सहा पैकी पाच तरूणांचा बुडून दुर्देवी मृत्यू, पाचही तरूणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
चंद्रपूर
पोहण्यासाठी उतरलेल्या सहा पैकी पाच तरूणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ब्रिटीशकालीन घोडझरी तलावात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवार रविवार हे सुटीचे दिवस असल्याने पर्यटनासाठी आलेल्या चिमूर तालुक्यातील कोलारी गावातील सहा तरुण घोडझरी तलावात तलावत उतरले असता पाच तरुणांचा यात बुडून दुर्देवी रित्या मृत्यू झाला.या घटनेने अख्खा चंद्रपूर जिल्हा हळहळला. रविवारी पाचही मृतदेहावर चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) या त्यांच्या गावी एकाच वेळी वेगवेगळ्या सरणावर पार्थिवाला चित्ताग्नी देण्यात आली. शनिवार पासून शोकसागरात बुडालेल्या कोलारी गावात आज आक्रोश, हुंदके आणि शोक पहायला मिळाला. एैन उमेदीच्या वयातच पाच तरूणांना काळाने हिरावून घेतल्याने अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना आपले अश्रू थांबविता आले नाही. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे यांचेवर अत्यंसंस्कार पार पडले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावावर शनिवारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज इंगोले हे सहा तरूण आले होते. दुपारपर्यंत त्यांनी घोडाझरी तलाव परिसरात भ्रमंती करून पर्यटनाचा आनंद लुटला. त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांना पोहण्याचा बेत रोखता आला नाही. सायंकाळी चारच्या सुमारास
ते पोहण्यासाठी तलावात उतरले. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीरी परिसरात ते पोहण्यासाठी उतरले. या ठिकाणी पाण्यासाठी जेसीबीद्वारे खोल खड्डे करण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना या खोलखड्याचा अंदाज घेता आला नाही. एकाचवेळी ते सहाही जण खड्यात बुडाले. त्यापैकी आर्यन इंगोले तरूण कसाबसा जीव वाचवित बाहेर आला. पाचही तरूण बुडाले. खोल खड्ड्यायमुळे जीव वाचविण्याची संधीच कुणाला मिळाली नाही. पाच पैकी चार तरूण एकट्या गावंडे कुटुंबातील होते. त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि दोन चुलत भाऊ व एका मित्राचा समावेश आहे. स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यक्तीकडून नागभीड पोलिसांनी तलावात तासभरात मृतदेह शोधून काढलीत. समाजमाध्यमांवर घटनेची माहिती वादळाप्रमाणे पसरली आणि अख्खा जिल्हा हळहळला.
त्यानंतर या घटनेची माहिती कोलारी (साठगाव) येथे पोहताच एकच आक्रोश झाला. कुटूंबियांनी हबंरडा फोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीवर त्या कुटूंबियाचा विश्वासच बसत नव्हता. गावात सर्वत्र घटनेची माहिती झाली आणि कोलारी गाव काल पासून शोकसागरात बुडाले. त्यांचे कुटुंबियांनी लगेच घटनास्थळ गाठले. मृतदेह नागभिड येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदना करीता पाठविण्यात आली, परंतु रात्र झाल्याने काल शनिवारी शवविच्छेदन होऊ शकले नाही. आज रविवारी करणार असल्याचे वैद्यकिय विभागाने सांगितले. काल शनिवार पासून शोकसागरात बुडालेल्या कोलारी गावात आज अंत्यसंस्कार प्रसंगी दु:खाचा प्रचंड आक्रोश, हुंदके आणि शोकाकूल वातारण बघायला मिळाले. आता त्या कुटुंबियांकडे जगाच्यापडद्याआड झालेल्या उमद्या मुलांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत.