ताज्या घडामोडी

स्वच्छता न करताच जुने बसस्थानक पुन्हा सुरु आगारप्रमुखांच्या निष्क्रिय भुमिकेबध्दल संताप

स्वच्छता न करताच जुने बसस्थानक पुन्हा सुरु आगारप्रमुखांच्या निष्क्रिय भुमिकेबध्दल संताप

अंबाजोगाई (प्रतिनिधी )

     अंबाजोगाई शहर बस स्थानक परीसरातील कॉंक्रेटीकरणाच्या नावाखाली गेली दोन महीने वंजारा वसतिगृह परीसरात स्थलांतरीत करण्यात आलेले बसस्थानक आज सकाळी पुन्हा पुर्वीच्या जागी कसल्याही प्रकारची स्वच्छता न करता सुरु करण्यात आले. आगार प्रमुखांच्या या निष्क्रिय भुमिकेबध्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई शहर बसस्थानक हे मराठवाड्यातील सर्वाधिक बसेस ये-जा करणारे केंद्र म्हणून गेली अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वच कानाकोपऱ्यात जाणा-या बसेसची या स्थानकात सतत येत जा असते.
या बसस्थानकाचे एक वर्षापुर्वी नुतनीकरण झाल्यानंतर स्वच्छता व इतर निकष पुर्ण करणारे एकमेव बसस्थानक म्हणून हे बसस्थानक महाराष्ट्रात सलग दोन वर्षे प्रथम आले होते. त्यामुळे हे बसस्थानक सतत चर्चेत होते.
या बसस्थानकाचे परिसरातील आतील मोकळ्या भागाचे डांबरीकरण वा कॉंक्रेटीकरण मागील काही वर्षांपासून झाले नसल्याने या नवीन बसस्थानकात प्रचंड धुळ होत असे व पावसाळा काळात तर सर्वत्र पाणीच साचत असे. नागरीकांची ओरड आणि लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा यामुळे या बसस्थानकाच्या आतील संपूर्ण भागाच्या कॉंक्रेटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती.
आठ दिवसांपूर्वी हे कॉंक्रेटीकरणाचे काम संपल्यानंतर वॉटरींगसाठी काही दिवस हे बसस्थानक सुरु करण्यात आले नव्हते.
आज सकाळपासून आगार प्रमुखांच्या सुचनेनुसार हे बसस्थानक पुर्ववत जुन्या बसस्थानकात सुरू करण्यात आले. मात्र हे बसस्थानक सुरु करण्यापुर्वी आगार प्रमुखांनी कॉंक्रेटीकरण केलेला संपुर्ण परीसर स्वच्छ धुवून काढण्याचे सौजन्य दाखवले नाही उलट अधिकृत नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कामगारांकडून बसस्थानक परिसराची साधी झाडलोट ही करुन घेतली नाही.


आज सकाळी बसस्थानक सुरु झाले तेंव्हा बसस्थानक परिसरात वॉटरींग करण्यासाठी आणलेले सुती पोत्यांचे ढिगारे ठिकठिकाणी पहावयास मिळले तर कॉंक्रेटीकरण केलेल्या सर्व जागेवर खाडीचे माठमोठे दगड जागोजागी आढळून आले. बसस्थानक परिसरात येणाऱ्या बसच्या टायर खाली आलेले हे दगड उडून जावून प्रवाशांना जखम करु शकतात किंवा एखाद्या अनुचित प्रकार घडण्याचे कारण ही ठरु शकतात.
पुर्व सुचना दिली; मग स्वच्छता का केली नाही?
अंबाजोगाई आगार प्रमुखांनी आज पासून बसस्थानक पुर्वीच्या जागी सुरु होईल अशी माहिती समाज माध्यमांवर दिली होती. तर मग आगार प्रमुखांनी बसस्थानक स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या कॉंक्रेटीकरणाची स्वच्छता का करुन घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!