मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे
मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे
अंबाजोगाई :-
मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. शैलजा बरुरे , तर सचिवपदी गोरख शेंद्रे यांची बिनविरोध निवड झाली.
मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या
नूतन कार्यकारिणी- २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नूतन
पदाधिकारी यांच्या निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अँड. आर.आर.निर्मळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.यात डॉ. राहुल धाकडे (अध्यक्ष), प्रा. डॉ. शैलजा बरुरे (उपाध्यक्ष),
मंजुषा कुलकर्णी (कोषाध्यक्ष), गोरख शेंद्रे (सचिव,) भागवत मसने (सहसचिव), तर कार्यकारिणी सदस्य म्हणून
विद्याधर पांडे (मुकुंदराज कवी संमेलन) , अनिरुद्ध चौसाळकर (मासिक मैफल), प्रा. सतीश घाडगे (विशेष उपक्रम,) प्रा. संतोष मोहिते (प्रसिद्धी व तंत्रज्ञान),
प्रा. रोहिणी अंकुश (भाषा दिन),
प्रा. डॉ. कल्पना बेलोकर-मुळावकर(दिन विशेष) या उपक्रमांची जबाबदारी या सदस्यांवर देण्यात आली आहे.तर निमंत्रित म्हणून
अमर हबीब (मार्गदर्शक),
तिलोत्तमा पतकराव (महिला)(स्पर्धा)तर पदसिद्ध सदस्य म्हणून दगडू लोमटे (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी अध्यक्ष), बालाजी सुतार (११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष), सुदर्शन रापतवार (११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष), अनिकेत लोहिया (नियोजित २ ऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष) यांचा कार्यकारिणी मध्ये समावेश आहे.
