ताज्या घडामोडी

बीडच्या सराईत गुन्हेगारांचा आणखी एक प्रताप उघड महाराष्ट्रात करतायत  घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी

बीडच्या सराईत गुन्हेगारांचा आणखी एक प्रताप उघड महाराष्ट्रात करतायत  घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी

    सोलापूर (प्रतिनिधी )

   महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तस्करीचा भयानक प्रकार उघडकीस आला आसुन सोलापुरात घोरपड या वन्यप्राण्याचे गुप्तांग तस्करी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील राहिवासी असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

    वन विभागाच्या सतर्कतेमुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आसुन या प्रकारानंतर वन खात्याने जंगलातील गस्त आणखी वाढवली आहे.

   सोलापुरात वनविभागाकडून ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून सोलापूर वनविभागाच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. घोरपड वन्यप्राणी हा वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेडूल एक मध्ये येतो. या प्राण्याला अतिउच्च दर्जाचे संरक्षण देण्यात आलेले आहे. घोरपड प्राण्याची शिकार करणे आणि विक्री करणे याला काद्याने बंदी आहे. मात्र, कुणी घोरपडीची शिकार अथवा विक्री करताना आढळल्यास संबधीत व्यक्तीला 10 हजार रुपये दंड आणि 7 वर्षे सक्त मजुरी अशा शिक्षेची तरतूद आहे. 151 घोरपडींचे गुप्तांगांची तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे बीड जिल्ह्यातील असून ते सराईत गुन्हेगार आहेत.

    घोरपड या प्राण्याचे गुप्तांग हात्था जोडी म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागात उच्चभ्रू लोक अंधश्रद्धेपोटी धनसमृद्धीसाठी घोरपड या प्राण्याचे गुप्तांग खरेदी करतात. अंधश्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात घोरपड प्राणी मारून हे अवयव विकले जातात. अटक करण्यात आलेले तीन ही आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याने पुन्हा एकदा बीड जिह्वा चर्चेत आला आसुन या प्रकारानंतर वन खात्याने जंगलातील गस्त आणखी वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!