ताज्या घडामोडी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व बन्सीधर शिरसाट यांच्या उपस्थिती मध्ये इलेक्ट्रॉनिक “IQUBE” स्कूटर चा भव्य लॉन्चिंग सोहळा संपन्न 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व बन्सीधर शिरसाट यांच्या उपस्थिती मध्ये इलेक्ट्रॉनिक “IQUBE” स्कूटर चा भव्य लॉन्चिंग सोहळा संपन्न 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते व मजूर संघाचे चेअरमन बन्सीधर आण्णा शिरसाट यांच्या उपस्थिती मध्ये इलेक्ट्रॉनिक “IQUBE” स्कूटर चा भव्य लॉन्चिंग सोहळा आज अंबाजोगाई शेअर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
    अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध उद्योजक व संदीप ऑटो ग्रुप अंबाजोगाई चे सर्वेसर्वा
गोपाळ पारीक, संदीप पारीक यांच्या यशस्वी ऑटो व्यवसायातील यशस्वी कामगिरी नंतर त्यांनी आता दुचाकी स्वारांना पेट्रोल पासून मुक्ती देण्या साठी  अंबाजोगाईच्या बाजार पेठेत इलेक्ट्रॉनिक “IQUBE” स्कूटर आणली असून
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांच्या शुभहस्ते बीड जिल्हा मजूर सहकारी संघाचे चेअरमन बन्सीधर आण्णा शिरसाट यांच्या सह रोटरी क्लबचे कल्याण काळे, बाजार समितीचे माजी चेअरमन मधुकर काचगुंडे, शरद इंगळे, आबा कदम, धनराज सोळंके, रामावत अनेकांच्या उपस्थिती मध्ये “संदीप ऑटो  टीव्हीएस शोरूम” मध्ये इलेक्ट्रॉनिक  “IQUBE” स्कूटरची भव्य लॉन्चिंग
सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
     या वेळी संदीप ऑटो ग्रुप अंबाजोगाई चे सर्वेसर्वा गोपाळ पारीक, संदीप पारीक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!