योगेश्वरीचा परमेश्वर दळवे राज्यात प्रथम. योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
योगेश्वरीचा परमेश्वर दळवे राज्यात सर्वप्रथम
योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृ.पु. चौसाळकर योगेश्वरी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवून आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे . या निमित्ताने ऑटोमोबाईल विभागातून राज्यात सर्वप्रथम आलेल्या परमेश्वर दळवे, गुणवंत विद्यार्थी,तंत्रनिकेतनमधून उत्तीर्ण झालेले शासकीय अधिकारी, विविध उद्योग समूहांमध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ श्री. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर बर्दापूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन धाराशिवचे प्रा. श्री. एल एम माने हे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री.गणपत व्यास, सचिव श्री.कमलाकरराव चौसाळकर,जेष्ठ सल्लागार प्रा. माणिकराव लोमटे,सहसचिव श्री.प्रताप पवार, श्री.अंगद कराड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.रमण देशपांडे यांनी केले. यावेळी प्रथम वर्षामधून शिवांजली स्वामी, सृष्टी आवाड, अदिती माळी,तेजस्वि घोरपडे,स्वाती होळकर, सोनाली कुलकर्णी, वेदांत जोशी, सौदागर बडे,पायल साळुंके,प्राची वायसे, वरूण थोरात, सानिका वायसे, द्वितीय वर्षातून तेजस्विनी सस्ते, हर्ष मुळे,श्रुतिका सूर्यवंशी, विशाखा तिडके,पार्थ वेदपाठक, रोहन जाधव,अश्विनी हारे, रोहिणी राऊत, तर तृतीय वर्षामधून ज्ञानेश्वर भांगे, दीप्ती दराडे,निकिता पवार, शुभांगी कत्राळे,अनिष्का लांडगे, स्नेहा देशमुख, अभिषेक बिराजदार या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.यावेळी मागील वर्षी उत्तीर्ण होऊन नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवलेले पवन सटाले, बोधिसागर सातपुते, अश्वमेध शेळके, वीरेंद्र मस्के या विध्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. माने सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कृ.पु.चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट तंत्रनिकेतन आहे असा उल्लेखदेखील बोलताना व्यक्त केला.व्यास गुरुजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करण्याचे आवाहन केले. तर नोकरीच्या मागे न लागता नौकरी देणारे उद्योजक व्हा असा सल्ला संचालक प्रताप पवार यांनी दिला. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी,गुणवंत शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक सचिव श्री. कमलाकरराव चौसाळकर यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध राहू असा विश्वास श्री. चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी दिला.
विद्यार्थांना मार्गदर्शन करून,तंत्रनिकेतनचा नावलौकिक वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे विभाग प्रमुख प्रा.रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट,प्रा. अतुल फड, प्रा. शाम गडदे,प्रा. बप्पासाहेब सोनवणे यांना याप्रसंगी कार्यकारी मंडळाच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी प्रीती मुंडे, वैष्णवी डिगे, सचिन फड, अभिजित मुजमुले, आसिफ शेख यांना देखील सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालकांच्या वतीने डॉ.राजकुमार थोरात,भारतराव सातपुते व जीवन सटाले यांनी तंत्रनिकेतनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.प्रियांका गंभीरे यांनी केले तर आभार प्रा. नारायण सिरसाट यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विदयार्थी व पालक उपस्थित होते.
———————————–
योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थी तंत्रशिक्षित होत असून, संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या सोयीमुळेच आम्ही शिकू शकलो. योगेश्वरी पॉलिटेक्निकबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
चि.अभिजित मुजमुले,शासकीय अधिकारी.
————————————–
योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत सुरक्षित वातावरण असून, मी एक पालक म्हणून संस्थेबाबत अत्यंत समाधानी आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करावे जेणेकरून या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.
श्री., भारतराव सातपुते, पालक.
