उदात्त व शुद्ध दृष्टिकोन बाळगून दृष्टीहीन कार्यप्रवण असतात – अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे
उदात्त व शुद्ध दृष्टिकोन बाळगून दृष्टीहीन कार्यप्रवण असतात – अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे

=======================
लातूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा लातूर यांच्यातर्फे दोन दिवशीय दृष्टीहीनांसाठी युवा महोत्सव – २०२५ बालाजी मंदिर पापविनाश रोड लातूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात सुगम गायन, काव्यवाचन, ब्रेल वाचन, प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
उद्घाटन प्रसंगी सदाशिव मोघे अध्यक्षस्थानी होते व प्रमुख पाहुणे गणेश कदम वाहतूक नियंत्रण अधिकारी लातूर हे उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय दृष्टिहीन शाखा लातूरचे महासचिव धनाजी होणे यांनी आपल्या संघटनेच्या कार्याची माहिती दिली. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.बाबासाहेब ठोंबरे (अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, लातूर), विजय भाऊ राठी आणि कालिदास माने उपस्थित होते. यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले व पुढे असे म्हणाले की, दृष्टहीनांनी दृष्टीकोन शुद्ध ठेवून काम केले आहे. दृष्टिहीन युवा कामाप्रति प्रामाणिक राहून ध्येयप्राप्ती साध्य करतात व तसेच यावेळी त्यांनी आनंदी जीवनाचे सूत्र समजावून सांगितले. याप्रसंगी माधव गोरे, भारत शिंदे, प्रभाकर कदम, चंद्रकांत मोघे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ जगताप यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तानाजी गंपले यांनी मानले. कार्याक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी गंगणे, भरत गोटमुखले, दशरथ सुरवसे, अंकुश मोरे, मनीषा होणे आणि पूजा राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
=======================
=======================
