ताज्या घडामोडी

तलाठी कार्यालयाला करावा लागणार आता बाय बाय! आता घरबसल्या फक्त 25 रूपयांत करता येणार महत्वाची कामे

तलाठी कार्यालयाला करावा लागणार आता बाय बाय! आता घरबसल्या फक्त 25 रूपयांत करता येणार महत्वाची कामे

 

मुंबई (प्रतिनिधी)

    महाराष्ट्र सरकारने वारस नोंदणी आणि सातबारा उताऱ्यावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली लागू केली आसन या सुधारित प्रणालीमुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नाही.

    संपूर्ण प्रक्रिया आता ई-हक्क पोर्टलद्वारे ऑनलाइन उपलब्ध झाली असून, नागरिकांना फक्त 25 रुपये शुल्क भरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे.

वारस नोंदणी म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर, त्याच्या नावावर असलेली शेतजमीन किंवा इतर स्थावर मालमत्ता कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित करण्यासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे असते. मृत व्यक्तीच्या पत्नी/पती, मुलगा, मुलगी किंवा आई यांना मालमत्तेचा हक्क मिळवण्यासाठी मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच सातबारा उताऱ्यावर नवीन वारसांचे नाव अधिकृतपणे चढवले जाते.

ई-हक्क पोर्टलद्वारे सोपी प्रक्रिया

पूर्वी ही प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना तलाठी आणि तहसील कार्यालयात जावे लागायचे. मात्र, महसूल विभागाने आता https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

वारस नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

ई-हक्क पोर्टलला भेट द्या आणि खाते उघडा.
वारस नोंदणी फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सादर केल्यानंतर १८ दिवसांत त्याची पडताळणी केली जाते.
सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यास वारसाचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवले जाते.

वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे

मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड
पत्ता पुरावा
अर्जदाराच्या ओळखीचा अधिकृत दस्तऐवज
आवश्यक असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र
वारसांचे प्रतिज्ञापत्र
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
जर मृत व्यक्ती सरकारी सेवेत कार्यरत असेल, तर संबंधित सेवा नियमावली व सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सातबारा उताऱ्यावर नाव चढवणे किंवा काढणेही ऑनलाइन उपलब्ध

वारस नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नवीन नाव समाविष्ट करण्याची किंवा मृत व्यक्तीचे नाव हटवण्याची सुविधा देखील ऑनलाइनच उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, बोजा चढवणे-कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, तसेच सातबारावरील चूक दुरुस्त करणे यासारख्या सेवा देखील ई-हक्क प्रणालीमध्ये जोडल्या गेल्या आहेत.

नवीन प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा

फक्त 25 रुपयांत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ही प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि सुटसुटीत झाली आहे. अनावश्यक दिरंगाई आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी डिजिटल पद्धतीचा उपयोग केल्याने महसूल विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षम झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या नवीन ऑनलाइन प्रणालीचा लाभ घ्यावा आणि वारस नोंदणी व सातबारा उताऱ्यावर नाव चढवणे-काढण्याची प्रक्रिया सोयीस्कर पद्धतीने पूर्ण करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!