BSNL पाडला 395 दिवसांच्या प्लॅनमध्ये ऑफर्सचा पाऊस, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरच काही…
BSNL पाडला 395 दिवसांच्या प्लॅनमध्ये ऑफर्सचा पाऊस, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरच काही…
बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी दिली असून सरकारी टेलिकॉम कंपनीने आपल्या कोट्यवधी वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक स्वस्त आणि परवडणारा वार्षिक प्लॅन सादर केला आहे.,
कंपनीने ग्राहकांना वर्षभर रिचार्जिंगच्या त्रासातून मुक्त करणाऱ्या या प्लॅनबद्दल पोस्ट करून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये अनेक ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत.
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. खासगी कंपन्यींनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यापासून बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. त्यात कंपनीने ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी अनेक सुवाधा देखील सुधारल्या आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिनेने त्यांचे प्लान महाग केले असले तरी BSNL अजूनही ग्राहकांना जुन्या किमतीत प्लान देत आहे. यामुळेच लाखो वापरकर्ते बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत. आता या ग्राहकाना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे
तुम्ही बीएसएनएल सिम वापरत असाल आणि ऑफर्ससह स्वस्त वार्षिक प्लॅन शोधत असाल तर आता बीएसएनएलने ही समस्या देखील सोडवली आहे. बीएसएनएलने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे. यात कंपनीने आपल्या नव्या प्लॅनविषयी माहिती दिली आहे. बीएसएनएलने यात 2399 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे. हा प्लॅन 395 दिवसांसाठी अमर्यादित स्वातंत्र्याचा पासपोर्ट असेल असे कंपनीने म्हटले आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन असा आहे ज्यात 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांची वैधता मिळेल.
मोफत कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा
बीएसएनएलने आपल्या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी ऑफर्सचा वर्षाव केला आहे. कमी किमतीत एका वर्षापेक्षा जास्त काळ रिचार्ज देणारा यापेक्षा स्वस्त प्लॅन इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे नाही. यामध्ये तुम्हाला सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर 395 दिवसांसाठी मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच तुम्ही दररोज 100 मोफत एसएमएस देखील वापरू शकता.
दररोज 2 जीबी डेटा मिळणार
तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर बीएसएनएलचा हा प्लॅन तुमचा आवडता प्लॅन असणार आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 395 दिवसांसाठी एकूण 790 जीबी डेटा देत आहे. तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता. तसेच दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही इंटरनेट ब्राउझ करू शकाल. परंतु तुम्हाला त्यानंतर 40 केबीपीएसचा स्पीड मिळेल.