ताज्या घडामोडी

या पुढे अनिश्चित काळा साठी एसटी बसने कर्नाटकला जाता येणार नाही, एस टी महामंडळाचा निर्णय

या पुढे अनिश्चित काळा साठी एसटी बसने कर्नाटकला जाता येणार नाही, एस टी महामंडळाचा निर्णय

मुंबई 

    महाराष्ट्रातल्या एसटीला अडवून चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे घडल्या नंतर महाराष्ट्रातील वातावरणही तापले असून महाराष्ट्रा मधील एस टी बसेस कर्नाटकात न पाठवण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतला आहे

    शुक्रवार (दि.२१) रात्री ९.१० वाजता मुंबई आगाराची बंगळुरू -मुंबई बस (क्र. MH14 K Q 7714) ही येत होती. चित्रदुर्गच्या अलीकडे दोन किलोमीटरवर ही बस आली असता कथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्त्यांनी ही बस अडवून बस चालकाला काळे फासल्याचा प्रकार केला . चालक भास्कर जाधव यांना या प्रकरणात मारहाणही करण्यात आली. कोल्हापूर आगारातील या चालक वाहकांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार चित्रदूर्ग पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. आज सकाळी कोल्हापूरच्या विभाग नियंत्रकांनी संबंधीत चालक व वाहकाला सुखरुप कोल्हापूरला आणले.

महामंडळाने घेतला निर्णय

या प्रकारानंतर आता एसटी महामंडळही अँक्शन मोडवर आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने जखमी चालक भास्कर जाधव यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा पहाता अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील, असे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाले मंत्री सरनाईक

या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. या प्रकरणात तुम्ही एकटे नसून सरकार तुमच्या खंबीरपणे

पाठीशी आहे, असेही सरनाईक यांनी जखमी कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्नाटक सरकार या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करत नाही तोपर्यंत कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!