अभियंता आडे, कर्मचारी कसबे व कंत्राटदार देशमुख यांच्या कृपेने शहरातील मोंढा रोड वर मागील 3 दिवसा पासून जातेय दररोज लाखो लिटर पाणी वाया
अभियंता आडे, कर्मचारी कसबे व कंत्राटदार देशमुख यांच्या कृपेने शहरातील मोंढा रोड वर मागील 3 दिवसा पासून जातेय दररोज लाखो लिटर पाणी वाया
मुख्याधिकारी प्रियंका टोंगे मूग गिळून गप्प असल्या मुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगर परिषदे मधील पाणी पुरवठा अभियंता आडे, या विभातील सर्वेसर्वा कर्मचारी कपिल कसबे व लाडके कंत्राटदार देशमुख यांच्या कृपेने शहरातील मोंढा रोड वर मागील 3 दिवसा पासून पाईप लाईन फुटल्या मुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असताना मुख्याधिकारी प्रियंका टोंगे मात्र मूग गिळून गप्प असल्या मुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
मागील 7 ते 8 वर्षा पासून अंबाजोगाई नगर परिषदेने पाणी पुरवठा विभागा मधील सर्व प्रकारची नवी आणि दुरुस्तीची कामे करण्या साठी देशमुख नामक कंत्राटदाराची नियुक्ती केलेली असून पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, या विभागातील सर्वेसर्वा कर्मचारी कपिल कसबे व कंत्राटदार देशमुख यांच्या संगणमताने या विभागात जो सावळा गोंधळ सुरू आहे या गोंधळा मागे मोठे अर्थकारण दडलेले आहे.
या विभागा अंतर्गत होणारी नवीन कामे आणि दुरुस्तीची कामे यातून केवळ भ्रष्टाचार सुरू नाही तर या महाभागा मुळे पाईप लाईन च्या दुरुस्त्या वेळेवर होत नसल्या मुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते आहे आणि या कडे कोणाचे ही लक्ष नाही हे दुर्दैव आहे.
विशेष म्हणजे मागील 3 वर्षात नगर परिषदेस ना नगराध्यक्ष आहे ना नगरसेवक आहे आणि याचा पुरेपूर फायदा हा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व कंत्राटदार घेताना दिसत आसून मागील 3 दिवसा पासून येथील मोंढा रोड वरील बाटा शो रूमच्या समोरील बाजूस
पाणी पुरवठा अभियंता आडे, या विभातील सर्वेसर्वा कर्मचारी कपिल कसबे व लाडके कंत्राटदार देशमुख यांच्या कृपेने पाईप लाईन फुटल्या मुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असताना न प च्या
मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांचे पाण्या सारख्या गंभीर विषयावर आणि या विभागात सुरू असलेल्या गैर प्रकारा कडे लक्ष नसल्याने आणि त्या मात्र मूग गिळून गप्प असल्या मुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
