घाटनांदुर येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
घाटनांदुर येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
घाटनांदूर (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने येथे विविध उपक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती घाटनांदुर यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये तीस शिवप्रेमींनी रक्तदान केले. शितल गणेश जाधव आणि साक्षी देशमुख या महिला रक्तदात्यांनीही रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील डॉ. रवी गुंडरे डॉ. अश्विनी जाधव, डॉ पाथरकर मॅडम, आनंद सिताप, बाबा भाई शेख, अफसर सय्यद, अजमद सय्यद, पवन हजारे, शुभांगी दहिवडे, संध्या पटाईत आदि उपस्थित होते. तसेच घाटनांदुर येथील माजी सरपंच ज्ञानोबा जाधव, माजी जि प सदस्य दत्ता जाधव, गोविंद देशमुख, विश्वजीत देशमुख सुभाष चव्हाण नेताजी देशमुख गणेश देशमुख सुरेश जाधव दिगंबर जाधव धनंजय जाधव गोविंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवजन्म समितीचे अध्यक्ष उत्सव जाधव धैर्यशील, जाधव अजिंक्य जाधव, किशोर जाधव, लखन पतंगे, सुनिकेत जाधव, सुनील जाधव, वशिष्ठ जाधव, रोहन राठोड, इमरान शेख, सुमेर शेख, महेश चव्हाण, जीवन अंधारे, निहाल गंगणे आदींनी कष्ट घेतले.
