मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी परीक्षेची घोषणा केलेली असताना शिक्षण अधिकारी श्री शिंदे व गट शिक्षण अधिकारी शेख यांच्या कृपेने अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या परीक्षा सेंटर सुरू आहे खुलेआम कॉपी
मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी परीक्षेची घोषणा केलेली असताना शिक्षण अधिकारी श्री शिंदे व गट शिक्षण अधिकारी शेख यांच्या कृपेने अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या परीक्षा सेंटर सुरू आहे खुलेआम कॉपी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी 10 वी 12 वी च्या परीक्षा पारदर्शी पणाने पार पाडण्या साठी काही कठोर निर्णयाची घोषणा केलेली असताना बीड येथील माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री शिंदे व अंबाजोगाई येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांच्या कृपेने अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या परीक्षा सेंटर वर खुलेआम कॉपी चे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात मागील काही वर्षात सुरू असलेल्या परीक्षेतील गैर प्रकारची गंभीर दखल विद्यमान मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा सुरू होण्या पूर्वीच
मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी 10 वी 12 वी च्या परीक्षा पारदर्शी पणाने पार पाडण्या साठी काही कठोर निर्णयाची घोषणा केलेली आहे. या मधे अंबाजोगाई तालक्यातील शहरात असलेल्या परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुख व काही कर्मचारी आपले केंद्र सोडून अन्य केंद्रावर परीक्षा पार पाडल्या साठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्या मुळे शहरातील परीक्षा केंद्रावर बऱ्या पैकी कॉपी वर नियंत्रण बसल्याचे दिसून येत आहे मात्र या उलट परस्थिती तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या परीक्षा केंद्रावर दिसून येत आहे.
अंबाजोगाई तालक्यात काही परीक्षा केंद्र हे कॉपीड परीक्षा केंद्र म्हणून सर्व परिचित असल्याने 10 वी व 12 वी चे शिक्षण घेणारे विद्यार्थी अंबाजोगाई शहरातील शाळा महाविद्यालयातील टी सी काढून अशा ग्रामीण भागातील अशा कॉपीड परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत प्रवेश घेत असल्याचे व त्या मुळे शहरातील नामांकित शाळा महाविद्यालये विद्यार्थ्या विना ओस पडत असल्याचे दिसत आहे. आणि अशाच ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर आज खुलेआम कॉपी चा प्रकार सुरू आहे.
या परीक्षा सुरळीत व पारदर्शी पणाने पार पाडण्याचे जबाबदारी ही बीड येथील माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री शिंदे व अंबाजोगाई येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांच्यावर आहे. ज्या प्रमाणे अंबाजोगाई शहरातील कॉपी रोखण्या करिता येथील परीक्षा केंद्राचे केंद्र प्रमुख व कर्मचारी अन्य परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात आले त्या प्रकारे ग्रामीण भागातील सर्व परिचित असलेल्या कॉपीड परीक्षा केंद्रावर ही अन्य ठिकाणचे केंद्र प्रमुख नियुक्त करण्यात का आले नाहीत या मागे काय गौड बंगाल आहे याचे गुपित मात्र गुलदस्त्यात आहे.
अंबाजोगाई येथील गटशिक्षण अधिकारी शेख यांचे कॉपी प्रकारा कडे पूर्ण पणाने काना डोळा असून बीड येथील माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री शिंदे व त्यांची धूळफेक करत अंबाजोगाई तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवणारे येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांची ग्रामीण भागातील खुले आम सुरू असलेल्या कॉपी प्रकारावरील दुटप्पी भूमिका याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
