केज येथील मजुराचा संशयास्पद मृत्यू युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त
केज येथील मजुराचा संशयास्पद मृत्यू युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त
केज (प्रतिनिधी)
केज शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे मजूर म्हणून काम करीत असलेल्या एका मजुराचा उपचारा दरम्यान संशयितरित्या मृत्यू झाला असून या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, केज शहरातील क्रांती नगर भागातील शंकर बाळू मस्के वय (३० वर्ष) हा युवक केज येथील एका बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम गुत्तेदाराकडे स्लॅब टाकण्याच्या लिफ्ट मशीनवर बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. दि. १२ फेब्रुवारी रोजी तो बांधकाम व्यावसायिक व एका बांधकाम ठेकेदार यांच्याकडे युसुफवडगाव येथे स्लॅब भरण्याचे काम करीत असताना जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या नंतर त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले होते. दि. १६ फेब्रुवारी त्याचा सकाळी १०:३० वा. अंबाजोगाई येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आसून या प्रकरणी शंकर मस्के याच्या कुटुंबियांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्या नंतर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.
