ताज्या घडामोडी

अंबजोगाईचे भूमिपुत्र डॉ आदित्य पतकराव यांची महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचे रेल्वे सल्लागार म्हणून नियुक्ती

अंबजोगाईचे भूमिपुत्र डॉ आदित्य पतकराव यांची महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचे रेल्वे सल्लागार म्हणून नियुक्ती

अंबाजोगाई करांच्या रेल्वेच्या सप्नाला बळकटी मिळण्याच्या आशा पल्लवित 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले डॉ. आदित्य पतकराव यांच्यावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या रेल्वे विकास सल्लागार समितीवर नियुक्ती केल्या मुळे अंबाजोगाईचा देशभरात सन्मान वाढला असून डॉ पतकराव यांच्या या नियुक्तीने व जिज्ञासू स्वभावामुळे या तीन ही राज्यांच्या रेल्वे विकासाला गती मिळण्या सोबत अंबाजोगाई करांच्या रेल्वेच्या सप्नाला बळकटी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
   डॉ. आदित्य पतकराव हे अंबाजोगाई येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे डॉ. आदित्य डेंटल केअर ऍन्ड रिसर्च सेंटर नावाचे मोठे रुग्णालयात चालवतात. दंत संशोधनात जागतिक पातळीवर त्यांनी अनेक संशैधन प्रबंध सादरकेले असून एक निष्णात वैद्यकीय दंत चिकित्सक त्यांची जगभर ख्याती आहे. अनेक प्रदेशांना भेटी देऊन त्यांनी तेथील रेल्वे प्रशासनाचा ही अभ्यास केला आहे.

अंबाजोगाईचा सन्मान वाढवणारी नियुक्ती

डॉ. आदित्य पतकराव यांची रेल्वे मंत्रालयाने केलेली ही नियुक्ती अंबाजोगाई शहराचा सन्मान वाढवणारी निश्चितच आहे, सोबतच महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या अडकलेल्या रेल्वे मार्गाला निश्चित गती देणारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व स्तरातून होते आहे अभिनंदन !

डॉ. आदित्य पतकराव यांच्या या नियुक्ती नंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातुन डॉ.
आदित्य पतकराव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राज्यातील उद्योजक, राजकारण आणि समाजकारण करणारे प्रतिनिधी सोबतच सर्वसामान्य स्तरातुनही त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रवासी सुविधा आणि स्टेशन विस्तार यांना देणार प्राधान्य

डॉ. आदित्य पतकराव यांनी या नियुक्ती नंतर माध्यम न्यूज नेटवर्क शी बोलतांना आपण रेल्वे स्टेशन विस्तारीकरण आणि प्रवासी सुधारणा यांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. यासोबतच रेल्वे उपक्रमांना पर्यावरणाची सांगड घालत “ग्रीन परियोजना” माध्यमातून रेल्वेच्या कामांना गती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

परळी बीड नगर रेल्वेमार्गाला देणार भेट

डॉ. आदित्य पतकराव यांनी आपल्या नियुक्ती बद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री ना. पियूष गोयल, रेल्वे मंत्रालयाचे सचीव यांचे विशेष आभार मानले असून आपण लवकरच परळी बीड नगर या प्रलंबित रेल्वे मार्गाला भेट देणार असून या मार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही माध्यम झुंजार न्युजशी बोलतांना सांगितले.

घाटनांदूर – श्रीगोंदा – दौंड रेल्वे मार्गा मुळे अंबाजोगाईकरांचे रेल्वेचे स्वप्न होऊ शकते पूर्ण

    मागील 40 वर्षा हून अधिक काळा पासून अंबाजोगाईकर रेल्वेचे स्वप्न पहात असून किमान अंबाजोगाई ते घाटनांदूर हा 16 किलोमिटरचां रेल्वे मार्ग जोडण्यात यावा या साठी बीड जिल्ह्याच्या स्व खासदार केशर काकू क्षीरसागर यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात आलेला होता. तसा सर्व्हे ही झाला होता. त्या नंतर 2015 मधे घाटनांदूर – अंबाजोगाई- केज- पाटोदा- जामखेड – श्रीगोंदा – दौंड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षना साठी रेल्वे मंत्रालयाने 34 लक्ष रुपयांची आर्थिक तरतूद ही केली होती. सर्व्हे चे काही काम करण्यात ही आले मात्र अहिल्या नगर – बीड – परळी या रेल्वे मार्गा च्या पुढे बीडच्या खासदार व या मार्गावरील लोक प्रतिनिधीला घाटनांदूर – दौंड या रेल्वे मार्गाचा विसर पडला असून अंबाजोगाई चे भूमिपुत्र डॉ आदित्य पतकराव यांची महाराष्ट्र सह तीन राज्याच्या रेल्वे सल्लागार पदी नियुक्ती झाल्याने घाटनांदूर – दौंड या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून अंबाजोगाई करांच्या रेल्वेच्या सप्नाला बळकटी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!