ताज्या घडामोडी

गरोदर पत्नीने गुन्हा दाखल केल्याने अस्वस्थ झालेल्या आयटी अभियंत्याने व्हॅलेंटाईन डे दिवशीच गळफास घेउन जीवनयात्रा संपवली

गरोदर पत्नीने गुन्हा दाखल केल्याने अस्वस्थ झालेल्या आयटी अभियंत्याने व्हॅलेंटाईन डे दिवशीच गळफास घेउन जीवनयात्रा संपवली

पुणे (प्रतिनिधी)

    जगभरातील प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन-डे साजरा करत असताना पिंपरी चिंचवड परिसरात एका आयटी अभियंत्याने पत्नी सोबत असलेल्या वादातून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले असून अजित दत्तात्रेय थोरवत (वय 30) असं त्याचं नाव आहे.

    पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अजित थोरवतने गळफास घेतला असून अजित थोरवत हा मूळचा कोल्हापूरचा होता. त्याचं दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील मुलीशी विवाह झाला होता. पिंपरी चिंचवड शहरात त्यांचा संसार आनंदात सुरु होता. लवकरचं त्यांच्या घरी तिसरा पाहुणाही येणार होता. मात्र अशातच दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला.

दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून वादाला तोंड फुटलं. या ना त्या कारणाने भांड्याला भांडं लागत राहिलं. अखेर अजितची पत्नी माहेरी निघून गेली. तिकडे गेल्यावर पत्नीने पोलिस स्टेशन गाठलं अन् अजितवर गुन्हा दाखल केला.

पती पत्नीच्या वादाचं हे प्रकरण न्यायालयात गेलं. दोनच दिवसांपूर्वी अजित कोल्हापुरात सुनावणी साठी गेला होता. तिथून तो परतला अन् तेव्हापासून तो खूप अस्वस्थ होता. दोन वर्षे सुखाने संसार केला, पत्नीवर जीवापाड प्रेम केलं, आता घरी छोटा पाहुणा ही येणार होता. मात्र पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली. हे अजितला पचनी पडलं नाही. आता जगण्यात काही अर्थ नाही असा विचार अजितच्या मनात येत होता. अखेर व्हॅलेंटाईन-डेचा दिवस उजाडला अन् अजितने गळफास घेत जीवन संपवलं. यामागे पत्नीशी झालेल्या वादाचे कारण असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!