श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांना गुंतवणूकदार जागृतीचा कार्यक्रम संपन्न
श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित
कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांना गुंतवणूकदार जागृतीचा कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी महाविद्यालयाने राबवला उपक्रम.
अंबजोगाई (प्रतिनिधी)
विद्यार्थी सुशिक्षित होतात मात्र प्रत्येक विद्यार्थी आर्थिक साक्षर असेलच असे नाही आर्थिक साक्षरता होणे काळाची गरज आहे, आपला पैसा कुठे व कसा गुंतवायचा, पैसे कसे कमवायचे, आलेल्या पैशाचे नियोजन कसे करायचे याचे ज्ञान विद्यार्थी दशेत मिळाले तर भविष्यामध्ये तो विद्यार्थी कधीच आर्थिक अडचणीत येणार नाही, यासाठी योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (सेबी) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन एस इ) अंतर्गत योगेश्वरी पॉलिटेक्निक आंबेजोगाई येथे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.
अलीकडे तरुण वर्गांमध्ये आर्थिक साक्षरता व आर्थिक नियोजनाचा अभाव जाणून येतो. तरुणांचा कल दिवसेंदिवस चैनी वस्तू, मौजमजा, बर्थडे पार्टी अशा गोष्टींकडे होत चालला आहे तसेच फसवणूक करणाऱ्या योजना ज्यामध्ये कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांची व सर्व सामान्यांची फसवणूक करतात आपणास पाहायला भेटत आहेत यामुळे भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक तसेच आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते म्हणून विद्यार्थी दशेमध्ये योग्य ती आर्थिक नियोजन त्यांनी केले तर भविष्यातील येणाऱ्या आर्थिक संकट ते निश्चितपणे टाळू शकतात व आर्थिक दृष्ट्या ते श्रीमंत आणि समृद्ध नागरिक बनू शकतात,, यासाठीच सेबी तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस इ चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री गणेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना बचत व गुंतवणूक याचे महत्त्व व फरक समजावून सांगितला, बँक व पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या बचतीच्या विविध योजना समजावून सांगितल्या, आर्थिक नियोजनाचे सात टप्पे समजावून सांगितले तसेच कॅपिटल मार्केट काय असते? म्युच्युअल फंड व त्याचे वेगवेगळे फायदे, इत्यादी बद्दल सखोल अशी मार्गदर्शन करून सेबीची वेब साईड व टोल फ्री नंबर देऊन भविष्यात फसव्या योजनांपासून सजग राहण्याच्या सूचना दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री रमण देशपांडे यांनी प्रयत्न केले, तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रियंका गंभीरे मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री .गणपत व्यास, का. उपाध्यक्ष ॲड जगदीश चौसाळकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, यांनी अभिनंदन केले आहे.
