ताज्या घडामोडी

भारतीय जैन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी धनराज सोळंकी यांची नियुक्ती

भारतीय जैन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी धनराज सोळंकी यांची नियुक्ती

नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा झाला पदग्रहन समारंभ

अंबाजोगाई – भारतीय जैन संघटना (बीजेएस) च्या मराठवाडा अध्यक्षपदी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज गौतमचंद सोळंकी यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी दिनेश राका तर सचिवपदी अशिष जैन यांची नियुक्ती झाली. या सर्व नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या उपस्थिीत संपन्न झाला.
अखिल भारतीय जैन संघटनेच्या नुतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा जालना येथील एका समारंभात पार पडला. या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, राष्ट्रीय महामंत्री दिपक चोपडा, महराष्ट्राचे अध्यक्ष केतन शहा, सचिव प्रविण पारख, प्रादेशिक उपाध्यक्ष विजयकुमार कोठारी, उद्योजक गौतम श्रीश्रीमाळ, जेपीसी बँकेचे अध्यक्ष संजयकुमार मुथ्था यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या पदग्रहन सोहळ्यात विभागीय अध्यक्ष धनराज गौतमचंद सोळंकी, उपाध्यक्ष दिनेश राखा, विजय सुराणा, निलेश पारख, सचिव अशिष जैन, निलेश ललवाणी, चंद्रसेन वायकोस, राहुल झांबड कार्यकारीणी सदस्य निलेश मुथ्था पवण सेठीया, आनंद कर्नावट, अधिकार मर्लेचा, सचिन कांकरीया, वर्धमान ढोले, नरेंद्र महाजन, धनराज जैन, आदेश नहार, हेमंत पोखरणा यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. तसेच यावेळी बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून अमित पगारीया सचिव सुशिल मुनोत, छत्रपती संभाजीनगर येथील अध्यक्ष राजेंद्र पगारीया, सचिव संजय लोेढा, जालना येथील जिल्हाध्यक्ष विजयकुमार जैन, श्रीश्रीमाळ, सचिव दिपक मोदी, जालना येथील महिला अध्यक्ष सरिता प्रविण कुचेरीया तर सचिव म्हणून मोनीका चंदन मोलीच्छा यांना पदाची नियुक्ती देण्यात आली.
यावेळी बोलताना नंदकिशोर साखला म्हणाले की, भारतीय जैन संघटना संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था सर व्यवस्थापक कोमल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जलसिंचनाचे काम करणार आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ जोपासण्यासाठी यावर्षी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!