ऍड माधव जाधव मारहाण प्रकरणाच्या वेळी बॉडीगार्डच्या तक्रारी वरूनअखेर 82 दिवसा नंतर 7 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
ऍड माधव जाधव मारहाण प्रकरणाच्या वेळेस बॉडीगार्डच्या तक्रारी वरून अखेर 82 दिवसा नंतर 7 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
बीड (प्रतिनिधी)
परळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी घडलेल्या ऍड माधव जाधव मारहाणीच्या वेळेस घडलेल्या प्रकारा वरून उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे बॉडीगार्ड मोहन रामा दांडगे यांच्या फिर्यादी वरून अखेर कैलास फड सह 7 जणांच्या विरुद्ध तब्बल 82 दिवसांनंतर पोलिसांनी कारवाई केली असून बीड मधे नेमक काय चालू आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
धक्कादायक म्हणजे, बीड पोलिसांनी आता व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून गुन्हा दाखल केला आसून विधानसभा निवडणुकीच्या वेळी परळीतील मतदान केंद्राबाहेर उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला धमकावण्यात आलं होतं. तसंच कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांना मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अखेर कैलास फड आणि त्याच्या मुलासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, कैलास फड याच्यावर यापूर्वीही हवेत गोळीबार केल्याच गुन्हा दाखल असून, त्याचा मुलगा बापाची बंदूक कंबरेला लावून फिरत असल्याचा आरोप झाला होता. आता नव्या गुन्ह्यामुळे फड पिता-पुत्र अडचणीत आले आसून मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी एवढा उशीर का केला? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी डिसेंबर २०२४ मध्ये ट्विट केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्यानंतर कैलास फडला अटकही करण्यात आली आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर आता कैलास फड याला जामीन मिळाला होता. कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे
