ताज्या घडामोडी

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या इसमास न्यायमूर्तींनी ठोठावलेल्या हटके शिक्षेची गावभर चर्चा, ही शिक्षा पाहून अन्य मद्यपी वाहन धारक धडा घेतील का? 

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या इसमास न्यायमूर्तींनी ठोठावलेल्या हटके शिक्षेची गावभर चर्चा, ही शिक्षा पाहून अन्य मद्यपी वाहन धारक धडा घेतील का? 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या पाटोदा येथील रहिवासी असलेल्या विशाल नरारे या इसमास अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा न्या खान साहेब यांनी एक हटकीच शिक्षा सुनावली ज्या शिक्षेची चर्चा सर्व शहरात असून ही शिक्षा पाहून तरी दारू पिऊन वाहन चालवणारे धडा घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
     या विषयी प्राप्त माहिती अशी की, बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावात यांच्या मार्गदर्शना खाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हे कॉ नाना राऊत हे 29 जानेवारी 2925 रोजी लोखंडी सावरगांव टी पॉइंट वर वाहन चेकिंग करत असताना त्यांना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी असलेले विशाल हरिश्चंद्र नरारे हे आपले चारचाकी वाहन चालवत असताना ते दारूच्या नशेत असल्याचे नाना राऊत यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी विशाल नरारे यांचे विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मधे गु रं न401/2024 कलम 185 मोटर वाहन कायदा या प्रमाणे
गुन्हा दाखल करून अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा न्या खान साहेब यांच्या समोर हजर करण्यात आले असता मा न्या खान यांनी विशाल हरिश्चंद्र नरारे यास दोन हजार रुपये दंड व “दारू पिऊन वाहन चालू नये” या आशयाचा फलक गळ्यात लावून दररोज दोन तास या प्रमाणे दहा दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थांबायचे असे शिक्षा ठोठावली.
    दरम्यान विशाल नरारे या इसमास अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा न्या खान साहेब यांनी ही एक हटकीच शिक्षा सुनावल्याने या शिक्षेची चर्चा सर्व शहरात असून ही शिक्षा पाहून तरी दारू पिऊन वाहन चालवणारे धडा घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!