संतोष देशमुखांना मारलं, बॉडी फेकली अन् चौकातून पोलिसां समोरून आरोपी पळाले आणखी एक व्हीडीओ आला समोर
संतोष देशमुखांना मारलं, बॉडी फेकली अन् चौकातून पोलिसां समोरून आरोपी पळाले आणखी एक व्हीडीओ आला समोर
बीड (प्रतिनिधी)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाशी येथील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आसून या व्हिडीओ मध्ये आरोपी हत्या केल्या नंतर फरार होण्या साठी जी स्कॉर्पिओ वापरली ती सोडून पळून जाताना दिसत आहे.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये मधील दोन महिने पूर्ण झाले असून मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. राज्यभर या घटनेची पडसाद उमटू लागले आहेत. अखेर या प्रकरणातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर आला असून 9 डिसेंबर 2024 म्हणजे हत्येच्या दिवसाचा हा संध्याकाळच्या वेळचा हा व्हिडीओ आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या केली त्या दिवशीचा व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या 18 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरी स्कार्पिओ सोडून रस्त्याने पळून जाताना दिसत आहेत.
आरोपी पोलिसांसमोर पळाले
या व्हिडीओमध्ये पाठीमागे पोलीस असताना देखील पोलिसांच्या समोर हे आरोपी पळून कसे गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्कार्पिओ रस्त्यावर सोडूनच हे सर्व आरोपी पळताना या व्हिडिओ दिसत आहेत. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरली होती. याच काळ्या रंगाच्या गाडीतून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं होतं.
स्कार्पिओ पोलिसांच्या ताब्यात
संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीस आणि आता हस्तगत केलेली आहे. ज्या स्कॉर्पिओ मधून या अपहरणानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली.त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते. आरोपी असलेल्या प्रतीक घुले याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. पुण्यामधून घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर जी स्कार्पिओ यामध्ये वापरण्यात आली ती स्कार्पिओ पोलिसांनी आता हस्तगत केलेली आहे.
