श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसरात बांधण्यात येणाऱ्या अन्नछत्राच्या वास्तू साठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन
श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसरात बांधण्यात येणाऱ्या अन्नछत्राच्या वास्तू साठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मोरेवाडी येथील मंदिर परिसरात बांधण्यात येणाऱ्या अन्नछत्राच्या वास्तू साठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदिराचे मुख्य सेवेकरी श्री नारायणराव डांगे सह सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अंबाजोगाई शहरा लगत मोरेवाडी परिसरात असलेल्या शंकर नगर वसाहती मधील अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात आज पर्यंत होणाऱ्या अन्नदानाच्या वेळी भाविकांना प्रसाद घेण्या साठी मोठी अडचण होत होती, भाविकांना महाराजांचा प्रसाद अक्षरशः रस्त्यावर बसून घ्यावा लागत असे. त्या मुळे ही गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने मंदिराचे मुख्य सेवेकरी श्री नारायणराव डांगे यांच्या पुढाकाराने अन्नछत्रा साठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा उद्देशाने मंदिरा लगत असलेली मोकळी जागा नुकतीच खरेदी करण्यात आलेली असून या मोकळ्या जागेवर भाविकांच्या सहकार्या मधून लवकरच अन्नछत्राच्या स्वतंत्र वास्तू उभारणीचे काम करण्यात येणार आहे.
या पवित्र कार्यास समाजातील प्रत्येक घटकांचा हातभार लागावा व सर्वाची सढळ हाताने मदत व्हावी या उद्देशाने मुख्य सेवेकरी श्री नारायण राव डांगे सह सर्व सेवेकऱ्यानी अन्नछत्राच्या वास्तू साठी सढळ हाताने आर्थिक किंवा आवश्यक वस्तू रुपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आसून ज्या भाविकांना अन्नछत्र वास्तू साठी सहकार्य करावयाचे आहे त्यांनी वरील स्कॅनर किंवा 9423891387 या फोन पे क्रमांकावर आपले योगदान पाठवावे (सर्वांना देणगी पावती मिळेल)असे आवाहन करण्यात आले आहे.
