जीपच्या भीषण अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू
जीपच्या भीषण अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू
केज(प्रतिनिधी)
कॅन्टर टेम्पो आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज केज-बीड रोडवर घडली असून अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीपमधून नातेवाईकांच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी पाच जण बीडहून आहिल्यानगरला चालले होते. दरम्यान केज-बीड रोडवर सांगवी (सारणी) पुलाजवळ टेम्पो आणि जीपची धडक झाली. यात उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या केज तालुक्यातील कोरेगावच्या रहिवासी होत्या.
बीड रोडवरील या भीषण अपघातामध्ये लक्ष्मण डोईफोडे, राम डोईफोडे आणि अन्य दोघांना जबर मार बसला. गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान लक्ष्मण डोईफोडे यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांवर दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहेत. नातेवाईकाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी, लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी हे पाच जण अहिल्यानगरला जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मृत व्यक्ती पेशाने शिक्षक असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय अपघातात तीन जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
