ताज्या घडामोडी

अंबाजोगाई जागतिक कॅन्सर डे च्या निमित्ताने आयएमएच्या  वतीने काढण्यात आली जनजागृती रॅली*

अंबाजोगाई जागतिक कॅन्सर डे च्या निमित्ताने आयएमएच्या  वतीने काढण्यात आली जनजागृती रॅली
———————————————
कॅन्सरचा वाढलेला विळखा चिंताजनक – डॉ.प्रियंका राठोड
———————————————

*अंबाजोगाई/ प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहरात जागतिक कॅन्सर डे च्या निमित्ताने आयएमए अंबाजोगाईच्या वतीने भव्य अशी जनजागृती रॅली 4 फेब्रुवारी या दिवशी काढण्यात आली. या रॅलीद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला व विविध घोषणांनी अंबाजोगाई शहर दणाणून गेले या रॅलीत विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था व विविध नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

राष्ट्रीय कॅन्सर डे च्या निमित्ताने सामाजिक संवेदना जिवंत ठेवत आणि भारतात वाढत असलेले कॅन्सरचे प्रस्थ हे चिंताजनक असून याला प्रतिबंध घालता यावा यासाठी शहरातील आयएमए संघटना, सर्व नर्सिंग कॉलेज, महिला संघटन, अंबाजोगाई इ च्या पुढाकाराने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा व लातूर येथील प्रसिद्ध कॅन्सररोग तज्ञ डॉ. प्रियंका राठोड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, आयएमएचे सचिव डॉ.सचिन पोतदार, सतीश लोणीकर,  कल्याण काळे, धनराज सोळंकी,तसेच साहिल मुथा, आदेश कर्नाटक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.पांढऱ्या रंगाची फीत कापून या कॅन्सर डे जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कॅन्सर जनजागृतीचे फलक घेतले हाती घेतलेले होते. विविध घोषणा या ठिकाणी दिल्या जात होत्या तर एलईडी व्हन द्वारे चौकाचौकात व अबाजोगाईतील शाळेत जावुन व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जात होती.

ही रॅली अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झाली त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सायगाव नाका, जुना पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी लातूर येथील कॅन्सर रोग तज्ञ डॉ. प्रियंका राठोड यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण सूचना करून प्रत्येकाने आता कॅन्सरची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. कारण आता कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे वेगवेगळ्या माध्यमातून कॅन्सरचा प्रभाव वाढला आहे.महिला पुरुष यांनी याबाबतीत काळजी घेतली पाहिजे सजगता म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टर हे त्याबाबतीत लक्षणे सांगतात आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. महिलांनी तीसी नंतर व पुरुषांनी 40 नंतर तपासणी करून घ्यावी. पूर्वी धुम्रपान हे एकमेव कारण कॅन्सरचे मानले जायचे पण आता कॅन्सरचा विळखा वाढतो आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून येऊ लागला आहे. धूम्रपानासोबतच आपली लाइफस्टाईल, बदलते पर्यावरण आणि आहार विहारातून सुद्धा कॅन्सरने आता जागा घेतली आहे. कॅन्सर डे च्या निमित्ताने ही जनजागृती रॅली महत्त्वाची ठरणार असल्याचा आशावाद डॉ. प्रियंका राठोड यांनी व्यक्त केला. तर आयएमएचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी बोलताना सांगितले की, आपल्या देशात प्रामुख्याने दोन आजारांचे आजारांचा प्रभाव वाढला आहे ज्यामध्ये हृदयरोग आणि कॅन्सर यांचा समावेश आहे ही चिंताजनक बाब आहे आपण ज्ञात असताना सुद्धा रिस्क घेतो आणि जीव गमावून बसतो. याचा मोठा परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो. जरदा असेल किंवा गुटखा असेल यावर शब्द स्पष्ट शब्दात अधोरेखित केलेले असताना सुद्धा आपण त्याला आपलेसे करतो तसेच डॉक्टर वारंवार कॅन्सर असो की हृदयरोग यासंबंधी काळजी घेण्याचे सांगत असतात त्याकडे साफ साफ दुर्लक्ष केले जाते. व्यायाम करण्याचे तसेच बदलत्या वातावरणाानुसार आहार विहाराचे नियम सांगतात पण काळजी घेतली जात नाही म्हणून प्रत्येकाचा जीव या ठिकाणी जातो. त्या दृष्टीने डॉक्टरांना प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे म्हणून सर्व समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन ही जनजागृती रॅली काढली असल्याचे सांगितले. या रॅलीत आयएमएचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, सचिव डॉ. सचिन पोतदार डॉ. सुधीर धर्मपात्रे,  ओमकेश मामा दहिफळे, डॉ. अनिल केंद्रे, स्वप्नील परदेशी, भीमाशंकर शिंदे, अंगदराव कराड,डॉ.निशिकांत पाचेगावकर, राजेंद्र घोडके, जगदीश जाजू, गणेश राऊत,डॉ. सुरेश आरसुडे ,स्वरूपाताई कुलकर्णी, बालाजी घाडगे ,संतोष मोहीते ,अजित देशमुख, तसेच प्रवीण सोळंकी, निलेश मुथा ,संतोष डागा,जवाहर मर्लेचा ,विजय बडेरा, मयूर बडेरा, पियुष मुथा, उदय रूपडा, मीना डागा, सुनीता कात्रेला तसेच शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असेल व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,स्टाफ नर्स, आरोग्य सेविका सेवक शिवाय विविध नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व त्यांचे प्राचार्य आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. या जनजागृती रॅलीचा समारोप संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पार पडला या ठिकाणी सुद्धा आयएमएचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी मार्गदर्शन केले.रो धनराज सोलंकी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!