ताज्या घडामोडी

तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरें यांची आत्महत्या, वारकरी संप्रदायात खळबळ

तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरें यांची आत्महत्या, वारकरी संप्रदायात खळबळ

पुणे(प्रतिनिधी)

   संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय 30) यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याने या घटनेने देहू परिसरासह वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे.

   शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे.

शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहतात. काल (मंगळवारी) रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रूमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडलं. मात्र, मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतय. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!