ताज्या घडामोडी

रील्सवाल्या दादांची पोलिसांनी मस्ती जिरवली, अख्ख्या शहरात धिंड काढली

रील्सवाल्या दादांची पोलिसांनी मस्ती जिरवली, अख्ख्या शहरात धिंड काढली

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी)

   पाचोड परिसरात इंस्टाग्रामवर धारदार शस्त्र घेऊन रील शूट करणे काही तरुणाला चांगलेच महागात पडले आसून दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक करून आख्या शहरात त्यांची धिंड काढून समाजमाध्यमांवर भाईगिरी चे विडियो पोस्ट करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या भाईंना इशारा दिला आहे.

    तरुणाईमध्ये आज सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आसून लाईक आणि कमेंट किती आल्या त्यावरून आपण किती प्रसिद्ध आहोत हे काही तरुण साध्य करत असतात. असाच काहीसा प्रकार छ.संभाजीनगर मध्ये घडला आहे.

सोशल मीडिया गॅंगस्टर म्हणून ओळखले जाणारे या रील्स भाईंनी कमरेला कट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन,इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केली होती. या व्हिडिओमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती .काही वेळातच पोलिसांनी या गावगुंडांना ताब्यात घेऊन शहरात या हुल्लडबाजांची चांगलीच धिंड काढली आहे. पोलिसांनी त्वरित त्या तरुणांचा शोध घेत इंस्टाग्रामवर त्यांचे रील पाहून त्यांना ताब्यात घेतले.त्यानंतर पोलिसांनी या तरुणांची पाचोड शहरात चौका चौकात धिंड काढली आणि सार्वजनिकपणे त्यांना पोलिस ठाण्यात नेले.

सोशल मीडियावर अशा प्रकारच्या दहशतीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना पोलिसांनी ठणकवून सांगितले आहे की, अशा हिंसक आणि वाईट प्रलंबित वर्तन हे खपवून घेतले जाणार नाही व त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पाचोड पोलिस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!