ट्रॅक्टर व मिनी बस चा अपघात 13 जण किरकोळ जखमी, स्वा रा ती रुग्णालयात उपचार, सर्वांची प्रकृती स्थिर
ट्रॅक्टर व मिनी बस चा अपघात 13 जण किरकोळ जखमी, स्वा रा ती रुग्णालयात उपचार, सर्वांची प्रकृती स्थिर
केज (प्रतिनिधी )
अंबाजोगाई – केज रोडवर होळ नजीक आज पहाटे ट्रॅक्टर व मिनी बस चा अपघात होऊन 12 जण किरकोळ जखमी झाले असून सर्वा वर स्वा रा ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
आज पहाटे नासिक येथील रहिवासी असलेले व एकाच कुटुंबातील सर्व जण देव मिनी बस मधून दर्शना साठी निघाल्याचे वृत्त असून होळं नजीक यांच्या मिनीबस ने एका ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने आत प्रवास करणारे बालू रामदास जाधाव (वय 60), गणेश नारायण पालिल (वय 36), सुळखा बॉल जोधर (वय 50), राजीव रामदास जाधोर (वय 65), कोमल संतोष जाधव (वय 40), अभिषेक संतोष जाधव (वय 20), रंजना राजीव जाधोर (वय 32), गौरव राजीव तधर (वय 32), ग्रिश्मा गौरव जॅडर (वय 6), जोनव्ही विलास पाटील (वय 13), अनुशाका सॉर्टेश जाधव (वय 15), संतोष रामदास जाधव(वय 45)
मयुरी गौरव साहोव (वय 30) हे किरकोळ जखमी झाले असून सर्वावर स्वा रा ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
