योगेश्वरी पॉलिटेक्निक राज्यात अग्रेसर विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेत घवघवीत यश
योगेश्वरी पॉलिटेक्निक राज्यात अग्रेसर विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षेत घवघवीत यश
अंबाजोगाई/प्रतिनिधीः महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी सत्र परीक्षा-२०२४ निकालामध्ये येथील कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंबाजोगाई येथे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी संस्थेचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले आहे.
यामध्ये प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी पदविका वर्गातून स्वामी शिवांजली (९३.१८%), प्रथम, माळी अदिती (९०.७१%) द्वितीय, मिश्रा आर्या (९०.२४%) तृतीय. द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी पदविका वर्गातून सूर्यवंशी श्रुतिका (९३.५३%) प्रथम, तिडके विशाखा (९२.९४%) द्वितीय, तिवारी प्रबल (९२.५६%) तृतीय. तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विभागातून लांडगे अनिश्का (९१.५६%) प्रथम, , देशमुख स्नेहा (९०.७८%) द्वितीय, देशमाने सायली (९०.२२%) तृतीय.
प्रथम वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून जोशी वेदांत (९२.३५%) प्रथम, बडे सौदागर (९१.७७%) द्वितीय, साळुंके पायाल (८९.२९%), तृतीय, द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी पदविका वर्गातून सस्ते तेजस्विनी (८६%). प्रथम, मुळे हर्ष (८१.५३%) द्वितीय, मुळे अंकिता (८०.७१%) तृतीय. तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी वर्गातून भांगे ज्ञानेश्वर (९४%) प्रथम, दराडे दीप्ती (९०%) द्वितीय, मुंडे नागनाथ (८८.२०%) तृतीय.
प्रथम वर्ष यंत्र अभियांत्रिकी वर्गातून होळकर स्वाती (९०.८२%) प्रथम, कुलकर्णी सोनाली (८८.७१%) द्वितीय, वाकडकर शुभांगी (८७.७७%) तृतीय, द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी पदविका वर्गातून, हारे अश्विनी (८५%) प्रथम, राऊत रोहिणी (७९.५६%) द्वितीय, चौघुले निलेश (७६.५६%) तृतीय, तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी वर्गातून पवार निकिता (८८.३८%) प्रथम, कत्राळे शुभांगी (८८.१०%) द्वितीय, हाके अहिल्या (८७.३३%) तृतीय.
प्रथम वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून चि. थोरात वरुण (८३.१८%) कु. वायसे प्राची (८३.१८) प्रथम, वायसे सानिका (८२.८२%) द्वितीय व कुलकर्णी मधुसूदन (८२.५९)%) तृतीय., द्वितीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून वेदपाठक पार्थ (८०.६३%) प्रथम, जाधव रोहन (७८.७५%) द्वितीय, सरवदे साक्षी (६९.५%) तृतीय, तृतीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकी वर्गातून दळवे परमेश्वर (९२.३२%) प्रथम, बिराजदार अभिषेक (९१.६८%) द्वितीय, शेटे ऋतुराज (८६.६३%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
चि. जोशी वेदांत, कु. होळकर स्वाती, कु. घोरपडे तेजस्वी, कु. माळी अदिती कु. स्वामी शिवांजली यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तसेच कु. वाकडकर शुभांगी व चि. बडे सौदागर यांनी गणित विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी प्रा.नारायण सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे विभागप्रमुख प्रा. रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे प्रा. बप्पासाहेब सोनवणे व सर्व शिक्षकीय कर्मचा-यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री .गणपत व्यास, का. उपाध्यक्ष अॅड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश वैद्य, संचालक श्री.प्रताप पवार यांनी अभिनंदन केले आहे. अशी माहिती कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी दिली.
इंसेट मध्ये:-
ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने तंत्रशिक्षीत होऊन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे नाव महाराष्ट्रात उज्वल करत असून, मी सर्व संचालकांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व तंत्रनिकेतनच्या शिक्षक वर्गाचे अभिनंदन करतो.
श्री.चंद्रशेखर बर्दापूरकर.
अध्यक्ष. यो.शि.संस्था अंबाजोगाई
