परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात 73 कोटी 36 लक्ष रुपयांची बोगस बिले- कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या कृपेने ही 16 कोटी 20 लक्ष रुपयांची बोगस बिले उचलल्याचा आ सुरेश धस यांचा गौप्य स्फोट
स
परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात 73 कोटी 36 लक्ष रुपयांची बोगस बिले- कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या कृपेने ही 16 कोटी 20 लक्ष रुपयांची बोगस बिले उचलल्याचा आ सुरेश धस यांचा गौप्य स्फोट
बीड (प्रतिनिधी)
परळी आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये 73 कोटी 36 लक्ष रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप ना धनंजय मुंडे यांच्यावर पत्रकार परिषदेतून सुरेश धस यांनी केला आसुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या कृपेने ही 16 कोटी 20 लक्ष रुपयांची बोगस बिले उचलल्याचे नमूद करून निधी वाटपामध्ये झालेला असमतोल दूर व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
बीड जिल्हा नियोजन समिती निधीतील सन 2021-2022 या कालावधीमध्ये परळी आणि अंबाजोगाई तालुक्यांमध्ये रस्ता कामांवर 73 कोटी 36 लाख रुपयांची बोगस बिले काम न करता उचलण्यात आली आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री तथा नियोजन व वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही माहिती सुपूर्द करणार असून बीड जिल्ह्यातील विकास निधी वाटपामध्ये झालेला असमतोल दूर व्हावा आणि तात्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील हा बोगस बिलांचा घोटाळा असून त्याची चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.. आष्टी येथील निवासस्थानी आयोजित विशेष पत्रकार परिषदे मध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन-2021-22 मध्ये परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यातील बीड जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या 57 कामांचे एकूण 14 कोटी 43 लक्ष 45 हजार रुपयांची बिले काम न करता काढण्यात आलेली आहेत त्याचबरोबर दि.31/12/2021 ते 31/3/2022 या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.2 बीड, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई, या कार्यालयांतर्गत एकूण 37 कोटी 70 लक्ष रू किमतीची बिले काम न करता उचलण्यात आली आहेत. पुढे बोलतांना ते म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई, या कार्यालयांतर्गत एकूण 37 कोटी 70 लक्ष रू किमतीची बिले काम न करता उचलण्यात आली आहेत. पुढे बोलतांना ते म्हणाले..
जिल्हा नियोजन समिती सन-2020 मध्ये परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यातील कामांची प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी रद्द केली असूनही या सर्व कामांची बिले आपल्या मर्जीतील सार्वजनिक बांधकाम परळीचे उपअभियंता संजय मुंडे यांच्याकडे प्रभारी कार्यकारी अभियंता या पदाचा कार्यभार दि.25 जून 2022 रोजी सोपवून 30/12/2021 रोजीच्या 2 कोटी 21 लक्ष, दि.18/3/2022 रोजीच्या 10 कोटी 98 लक्ष, दि.25/3/2022, 6 कोटी 59 लक्ष,
दि.26/3/2022 16 कोटी 48 लक्ष, तर दि.31/3/2022 रोजीचे 1 कोटी 34 लक्ष
असा एकूण 37 कोटी 70 लक्ष रूपायांचा घोटाळा परळी मतदारसंघात झाला आहे.
ही माहिती आज पहिल्यांदाच जिल्हानियोजन समितीची बैठक होणार
असून त्यामध्ये पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे आ.धस यांनी सांगितले
बांधकाम विभाग अंबाजोगाई अंतर्गत रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम सन 2021-2022 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये कोणत्याही रस्त्यावर काम न करता
दि.13/12/2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी रुपये आणि दि.18/2/2022 रोजी एक कामाचे 1 कोटी 20 लाख रुपये असे
एकूण 16 कोटी 20 लक्ष रुपयांची बोगस बिले तत्कालीन कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांचे कालावधीमध्ये उचलण्यात आली आहेत.
त्याच बरोबर बजेट अर्थसंकल्पीय कामांमधील हायब्रीड अॅन्यूटी अंतर्गत मंजूर असलेले आणि सध्या सुरू असलेले 59 कोटी रुपयांचे रस्ता काम सुरू असून याच रस्ता कामावर 6 कोटी 30 लाख रुपयाचे आणखी एक काम मंजूर करून काम केल्याचे दाखवून परळी-पूस- बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता उचलण्यात आले आहेत. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाची क्षेत्रीय कार्यालयाचे तपासणी वेळी लक्षात येऊन त्यांनी या कामात द्विरुक्ती झाली म्हणजेच
एक काम दोन वेळा मंजूर करून त्यातील पाच कोटी रुपयांची बिले उचलण्यात आले आहेत असे पत्र कक्षअधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांनी दि.17/3/2022 रोजी दिले आहे. अशा प्रकारे बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण 73 कोटी 36 लाख रुपयांचे रस्ते विशेषतः रस्ते कामांमध्ये बोगस बिले उचलण्यात आली आहेत.
ही परळी मतदारसंघातील आहेत. ही विशेष बाब आहे असेही आ. सुरेश धस यांनी सांगितले आणि या सर्व घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करणार आहोत असेही त्यांनी शेवटी सांगितले.
