ताज्या घडामोडी

अंबाजोगाई शहरात गुंडाची दहशत 3 मोटार सायकल सह 2 भेळच्या गाड्यांची तोडफोड, पोलीस यंत्रनेणे अशा गुंडावर वचक बसवण्याची आवश्यकता

अंबाजोगाई शहरात गुंडाची दहशत 3 मोटार सायकल सह 2 भेळच्या गाड्यांची तोडफोड, पोलीस यंत्रनेणे अशा गुंडावर वचक बसवण्याची आवश्यकता

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   अंबाजोगाई शहरात काल रात्री काही गुंड प्रवृतीच्या टोळक्याने गावभर फिरून 3 मोटार सायकल सह 2 भेळ च्या गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असुन पोलीस यंत्रनेणे अशा गुंडावर वचक बसवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
    या विषयी प्राप्त माहिती अशी की, मागील काही दिवसा पासून अंबजोगाई शहरातील काही टुकार मुलांच्या टोळ्या शहरात वेगवेगळ्या पद्धतीने गुंडगिरी करून दहशत निर्माण करत असताना  दिसत आहेत. यात पुन्हा काही बडे घर की बिगडी हुयी अवलादे बुलेट सह अन्य दुचाकी गाड्यांना कर्न कर्कश्य आवाजाचे सायलेन्सर, हॉर्न लावून भरधाव वेगाने गावभर दुचाकी फिरवत असतात. या संदर्भात अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून देण्यात आला मात्र अशा टुकार टोळक्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही. शहरात दहशत निर्माण करणारे टोळके दुचाकी
स्वाराना रस्त्यात अडवून त्याचे पैसे काढून घेणे, सोने काढून घेणे, मारहाण करणे असे प्रकार वारंवार करत आहेत.
     काल रात्री अण्णाभाऊ साठे चौक येथे भेळ पाणीपुरी चा व्यवसाय करणाऱ्या कडे येऊन या टोळक्याने हातात आणलेल्या कोयत्या सारख्या धारधार शस्त्राचा धाक  दाखवत त्या गाड्यांची तोडफोड केली.
याच टोळक्याने नंतर तथागत चौक या ठिकाणच्या व त्या पासून काही अंतरावर असलेल्या डॉ सचिन पोतदार यांच्या हॉस्पिटल समोर उभा असलेल्या अशा एकूण 3 दुचाकीला फोडल्याची खात्रीलायक माहिती आहे.

वेळीच पायबंद न घातल्यास शहरात कोयता गँग तयार होतील

अंबाजोगाई शहरातील वाढती गुंडगिरी पाहता या टोळक्यावर वेळीच पायबंद घालन्याची आवश्यकता असून ही गुंडगिरी अशीच चालू राहिली तर भविष्यात अंबाजोगाई शहरात पुणे मुंबई सारख्या कोयता गँग तयार झाल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!