*भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*
*भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*

=======================
अंबाजोगाई (वार्ताहर)
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखर येथे ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे सभापती ऍड.राजेश्वरराव चव्हाण, केज कृ.उ.बा.समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, धारूर कृ.उ.बा.समितीचे उपसभापती सुनीलराव शिनगारे, बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक श्री.ऍड.प्रमोद जाधव, ऍड.लालासाहेब जगताप, ऋषिकेश आडसकर, गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे, जीवनराव कदम, अशोकराव गायकवाड, बालासाहेब सोळंके, विठ्ठलराव देशमुख, अनंतराव कातळे, लक्ष्मीकांत लाड, विजयराव शिनगारे, संभाजीराव इंगळे, मिनाज युसुफखाॅं पठाण, मधुकरराव शेरेकर, रमाकांतराव पिंगळे, अनिलराव किर्दंत, शशिकांतराव लोमटे, श्रीमती भागिरथीबाई साखरे, श्रीमती वच्छलाबाई शिंदे, माजी कार्यकारी संचालक एस.बी.साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांच्यासह लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव पवार, माजी संचालक दाजिसाहेब लोमटे, उध्दवराव इंगोले, अजयराव (चिमू) पाटील, शिवाजीराव मायकर, रमेशराव नखाते, धारूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव खुळे, ऍड.बालासाहेब इंगळे, रामकिसन खोडसे, शिंदे मामा, बाळासाहेब देशमुख, मोरेवाडीचे माजी सरपंच वसंतराव मोरे, माजी नगरसेवक कमलाकर कोपले, अनिल माचवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुसंख्येने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवर, कारखाना परिसरातील शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, अंबासाखरचे अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी मानवंदना दिली. सर्वांच्या सामुहिक राष्ट्रगीत गायनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तर उपस्थितांना चहापान करण्यात आले. या प्रसंगी चेअरमन रमेशराव आडसकर यांनी ध्वजवंदन कार्यक्रमासाठी कारखान्याच्या प्रांगणात उपस्थित झालेल्या सर्वांच्या भेटी घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून संवाद साधला. तसेच ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
=======================
=======================
