योगेश्वरी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ टेम्पो चालकांने तीन महिलांना उडवले, एक जागीच ठार तर दोन जखमी
योगेश्वरी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ टेम्पो चालकांने तीन महिलांना उडवले, एक जागीच ठार तर दोन जखमी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिराच्या पाठीमागील प्रवेशद्वाराजवळ टेम्पो चालकांने तीन महिलांना उडवल्या नंतर एक महिला जागीच ठार तर दोन महिला जखमी झाल्या आहेत.
एम एच 28 बीबी 3227 क्रमांकाचा हा टेम्पो बचत गटाच्या कामा निमित्य येथील योगेश्वरी मंदिर परिसरात आला होता. टेम्पो चालक टेम्पो पार्किंग मध्ये नेत असताना त्याला तो कंट्रोल झाला नाही आणि त्याने बाजूला जोगवा मागत बसलेल्या तीन महिलांना चिरडले यात
केशरबाई धोंडीराम जोगदंड (रा परळी वेस, अंबाजोगाई) ही महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघींना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान ही घटना घडतात टेम्पो चालक त्या ठिकाणहुन फरार झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी टेम्पो पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जमा केला आहे.
