मोक्काचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोक्काचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड (प्रतिनिधी)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्काचा गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आसून वाल्मीक कराडला आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
याआधी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मीकला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाढीव कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सीआयडीने कराडच्या कोठडीचा अधिकार अबाधित ठेवला आहे. त्यामुळे गरज पडल्यास सीआयडी कराडच्या कोठडीची मागणी करू शकते.
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार
वाल्मीक कराड आणि आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज हे खात्रीलायक पुरावा आहे. सीआयडी, एसआयटीकडे पुरावा सादर झाला आहे. कृष्णा आंधळे दोन वर्षापासून फरार असल्याचे म्हणतात. पण सीसीटीव्हीमध्ये तो दिसत आहे. तो फक्त कागदोपत्री फरार असून पोलिसांसोबत दिसत आहे. यावर उत्तर द्यावे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. तसेच वाल्मीकला न्यायालयीन कोठडी हा न्यायप्रक्रियेचा भाग असून आम्हाला न्याय मिळण्यासाठी ठोस पावलं कुठेतरी कमकूवत पडू नये, असेही ते म्हणाले.
