*नकली दागिने विकण्यास आलेल्या 2 जणांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेतले*
नकली दागिने विकण्यास आलेल्या 2 जणांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेतले
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागात असलेल्या पद्मावती ज्वेलर्स या दुकानात नकली दागिने विकण्यास आलेल्या 2 जणांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपी कडून शहरातील काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी
अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागात असलेल्या पद्मावती ज्वेलर्स या दुकानात आज मंगळवारी दोन युवकांनी नकली असलेले चांदीचे दागिने विकण्याचा प्रयत्न केला असता सदर दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्याने दुकान मालकाने त्यास काहीवेळ पकडून ठेवले ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी त्यांचे कर्मचारी त्या दुकानात पाठवले. या वेळी पकडलेल्या 2 जणांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोन्ही आरोपी विरुद्ध पद्मावती ज्वेलर्सचे मालक पवार यांचे तक्रारी वरून 420 हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या आरोपी कडून शहरातील काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
