*मैत्रा फाउंडेशन बीडच्या वतीने अंबानगरीचे सुपुत्र तथा कवी भागवत मसने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
मैत्रा फाउंडेशन बीडच्या वतीने अंबानगरीचे सुपुत्र तथा कवी भागवत मसने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- मैत्रा फाउंडेशन बीड या सामाजिक संस्थेच्या वतीने अंबाजोगाई शहराचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध कवि भागवत रामकृष्ण (बी आर ) मसने यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक गौतम खटोड , प्रा गाडेकर,मैत्रा फाउंडेशनचे अध्यक्ष द ल वारे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड , पत्रकार संग्राम धनवे, श्रीमती हर्षा ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम दि १९ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, बीड येथे संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक शिक्षक देखील सहभागी झाले होते.
नुकतेच मैत्रा फाउंडेशन च्या वतीने सन्मानित करण्यात आलेले सुप्रसिद्ध कवि तथा शिक्षक भागवत मसने हे कवी म्हणून देखील सर्वदूर सुपरीचीत आहेत . त्यांनी आपल्या शैक्षणिक विषयां सोबसतच अनेक प्रकारच्या कवितांच्या माध्यमातून केवळ अंबाजोगाई शहरातच नव्हे तर राज्यभरात विविध ठिकाणच्या कवी संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे.
भागवत रामकृष्ण मसने यांचे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण हे खोलेश्वर विद्यालय व महाविद्यालयात झाले आहे. १९८९ साली बारावीत असतानाच के. के. एम. कॉलेज मानवत येथे झालेल्या वाद विवाद स्पर्धेत भागवत मसने यांना मराठवाडा स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. पुढे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नाट्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. या महाविद्यालयीन जीवनात वाद विवाद स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , काव्यवाचन स्पर्धा ,अशा विविध प्रकारच्या स्पर्धांमधून एकूण ३२ बक्षीस मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे . वैयक्तिक सन्मानासह भागवत मसने यांनी तालुकास्तर , कधी जिल्हा तर कधी मराठवाडा विद्यापीठ त्याचबरोबर कधी महाराष्ट्रातुन सांघिक पारितोषिक स्वामी रामानंद महाविद्यालयालास प्राप्त करून दिले आहेत.
एम ए हिंदी ही डिग्री पूर्ण झाल्यानंतर तासिका तत्त्वावर श्री योगेश्वरी महाविद्यालय वरिष्ठ स्तरावर प्राध्यापक म्हणून सात वर्ष काम करतांना अनेक विद्यार्थी वक्तृत्व तसेच वादविवाद स्पर्धेत घडवले. २००२ साली श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात रुजू झाल्यापासून आजपर्यंत येथेही अनेक विद्यार्थी घडवत आहेत. त्यांनी स्वतः पाच एकांकिका व पाच गीते लिहून विद्यालयाच्या विद्यार्थी चमूद्वारे बीड आकाशवाणीवर सादर करण्याच्या बहुमान मिळवला आहे. मागील अनेक वर्षापासून विविध विद्यालय तथा महाविद्यालयात स्वतःचा एक ते दीड तासाचा हास्य व्यंगात्मक कार्यक्रम सादर करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन , एनएसएस शिबिराचा समारोप , विविध ठिकाणच्या वाद-विवाद वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण तसेच अनेक कवी संमेलनाचे बहारदार असे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
अशा या हरहुन्नरी , सदाबहार व शैक्षणिक विषयांसह अनेक विषयांत पारंगत असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व भागवत रामकृष्ण मसने यांना मैत्रा फाउंडेशन बीड च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे भागवत मसने यांच्यावर शैक्षणिक , सामाजिक ,राजकीय तथा अन्य क्षेत्रातील विविध मान्यवराकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
