ताज्या घडामोडी

वसंतराव काळे पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न्

वसंतराव काळे पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न्

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील वसंतराव काळे पब्लिक स्कुल, लिटल चॅम्प्स् प्रि स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन मुंकुदराज सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारांची सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध्‍़ा केले.


लिटल चॅम्प्स् प्रि स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून क्षमता वर्धन ॲकाडमीचे संचालक कौस्तुभ दादा कोदरकर व डॉ. सारीका बुरगे मॅडम, प्राध्यापक सरस्व़ती महाविद्यालय केज, उपस्थित होते तर वसंतराव काळे पब्लिक स्कुल वार्षिक स्नेहसंमेलनास दुपारच्या सत्रात अंबानगरीचे माजी नगराध्य़क्ष राजकिशोर मोदी सर, न्युरोसर्जन डॉ. अमोल दहिफळे सर व बालरोग तज्ञ, डॉ. श्रीनिवास रेड़डी सर व संस्थेचे उपाध्य़क्ष डॉ. महेंद्रकुमार जाधव सर उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडा, गणेश वंदना, गोंधळ, लावणी, भक्तीमय गीत, भारूड, सोशल मिडिया व मोबाईल फोनच्या अतिवापर प्रकाश टाकणारे गीत, मराठी गीतासह अनेक हिंदी गीते सादर करून चिमुकल्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर लिलिपुट डांन्स़ हे विशेष आकर्षण राहिले. यावेळी शाळेने अनेक सामाजिक विषय आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनातून मांडत सभागृहातील सर्वांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. श्रीनिवास रेड़डी सर व डॉ. अमोल दहिफळे सर यांनी विद्यार्थ्यांना योग, आरोग्य़, प्रयत्ऩ, संतुलित आहार व अभ्यासाचे महत्व़ व सध्याच्या युगात उपलब्ध्‍़ा विविध क्षेत्रातील करिअरची संधी या बदद़ल मार्गदर्शन केले तर डॉ. सारिका बुरगे मॅडम व जेष्ठ़ नेते राजकिशोर मोदी यांनी टिव्ही, मोबाईल पासुन दुर राहत खेळाला महत्व़ देण्यास सांगितले व भविष्यातील राष्ट्राच्या उभारणीसाठी जागरूक व संवेदनशील नागरिक या शाळेच्या माध्य़मातून घडावेत असे विचार मांडले.

यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. केदार वाघमारे सर व श्री. सुमंत केदार सर यांनी शाळेचे वार्षिक अहवाल सादर केले. तर संस्थ़ेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे सर यांनी सर्व आव्हानांना सामोरे, जाणारे बहुआयामी विद्यार्थी तयार करणे हेच आमुचे ध्येय असुन आतापर्यंत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस व इजिंनिअरींग, विविध क्षेत्रात प्रवेश मिळवता आला याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे असे सांगितले. माझी शाळा सामान्यातील सामान्य़ माणसाला परवडेल हा माझा संस्था चालवताना मानस आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चि. नैतिक काळे, सृष्टी केदार व नितिशा काळे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्य़श्री शर्मा मॅडम व नुरजहाँ काझी मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रिका कोमल मॅडम यांच्या कौशल्यातुन तयार केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्ऩ केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!