घरात घुसून मॅनेजरला व अल्पवयीन मुलीला मारहाणं प्रकरणी वाल्मिक कराडच्या मुलावर गुन्हा दाखल करण्या संदर्भात न्यायालय आज निर्णय देणार
घरात घुसून मॅनेजरला व अल्पवयीन मुलीला मारहाणं प्रकरणी वाल्मिक कराडच्या मुलावर गुन्हा दाखल करण्या संदर्भात न्यायालय आज निर्णय देणार
सोलापूर(प्रतिनिधी)
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड याच्यावर वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून मारहाण व अल्पवयीन मुलीस मारहाण केल्याचा आरोप आसून याप्रकरणी सोलापूर न्यायालयात दाखल असलेल्या खाजगी फिर्यादीवर सुनावणी काल पूर्ण झाली असून यावर न्यायालय आज निर्णय घेणार असून सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा सुशील कराडवर आरोप आहे. सोलापूर न्यायालयात दाखल असलेल्या खासगी फिर्यादीवर काल सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. याबाबत पोलिसांनी फिर्याद दाखल करावे किंवा नाही या बाबतीत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय आज आदेश देणार आहे.
परळीतील प्लॉट व सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचाही आरोप-
सुशीलने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदूकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट व सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे व गोपी गंजेवार यांच्याविरुधातही ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मॅनेजरच्या घरी लूट करताना हे दोघे त्याच्याबरोबर होते. दरम्यान, संबंधित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर पोलीस आयुक्त व बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
