ताज्या घडामोडी

५ वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा  रक्तरंजित बदला, सैराटची पुनरावृत्ती, अन्य 6 जण जखमी

५ वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा  रक्तरंजित बदला, सैराटची पुनरावृत्ती, अन्य 6 जण जखमी

 

जळगाव (प्रतिनिधी)

   ५ वर्षापूर्वी पळून जाऊन प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी जावयाची कोयता आणि चॉपरने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात घडली आसून सैराट चित्रपटाला साजेशा या हत्ये सोबत मुलाकडील ७ जणांवरही शस्त्राने हल्ला करण्यात आला असून ते जखमी आहेत.

    या प्रकरणीआतापर्यंत ६ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून मृताच्या चुलत्याने या हत्याकांडाचा बदला घेण्याचा जाहीर विडा उचलल्याने सूडाग्नीचा भडका उडाला आहे.

   मुकेश रमेश शिरसाठ (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने पाच वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. प्रेम विवाह केलेला तरुण आणि तरुणी दोघेही एकाच जातीचे आहेत. माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी चार ते ५ वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणातून लग्न केलं. त्यानंतर मी त्यांच्या घरी सुद्धा गेले नाही, त्यांनी मला व माझ्या पतीला वारंवार त्रास दिला, असा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे.मला दोन मुलं आहेत. आता ती मुलं कुणाकडे दाद मागणार? आणि मी देखील कशी काय राहू? यांना जर मुलगी लागत होती तर माझा हिरा का हिरावून घेतला?”असा सवाल तरुणीने केला आहे.

त्यांचे १-२ खल्लास करू तेव्हाच शांत बसू –

मृत मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाठ यांनी सांगितले की,आमच्या मुलाने त्यांच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून मुलासोबत त्यांचे जुने वैर होते. आमच्या संपूर्ण कुटूंबाला ते दुश्मन मानत होते व मुकेशला जीवे मारण्यासाठी संधीची वाट बघत होते. त्यांना माहिती होते की, रविवार असल्याने मुलगा घरी असतो. यांच्यासोबत आपण काहीतरी करू. त्यामुळे त्यांनी नियोजन करून त्याच्यावर हल्ला केला व त्याला संपवले. हल्लेखोरांनी कोयते,लोखंडी रॉड, चॉपरआणि तलवारीने हल्ला केला. अनेक लोकांना घरावर विटा देखील फेकल्या. जवळपास २५ ते ३० लोकांना आमच्या घरावर हल्ला केला. त्यांना वाटत असेल की,त्यांनी आमच्या पोराला मारले आहे. त्यांचे देखील आम्ही एक-दोन खल्लास करू,तरच आम्ही राहू. या बदला घेण्याच्या विड्याने परिसरातील तणाव वाढला आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश शिरसाठया तरुणानेपाच वर्षांपूर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या बनसोडे कुटूंबातील पूजा या तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय आणि बनसोडे कुटूंबामध्ये वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश काही कामासाठी घराबाहेर पडताच सासरच्या लोकांनी त्याच्यावर कोयता, चॉपरने सपासप वार केले. या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. मुकेशला वाचवायला गेलेल्या त्याचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि चुलत बहीण यांच्यावरही हल्ला झाला असून य़ात ७ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातउपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिसरातील तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!