मुलीची छेडछाड करून जिवे मारण्याची धमकी महिलेसह चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
मुलीची छेडछाड करून जिवे मारण्याची धमकी महिलेसह चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
केज :-(प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिला लग्नासाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणाहून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेसह चौघांवर पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.
पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मध्ये अनिकेत तुकाराम घुगे, विशाल सूर्यकांत मुंडे, रमेश बबन नागरगोजे, कुशावर्ती ऊर्फ कुशाबाई रावसाहेब शेप या आरोपींचा समावेश असून यातील तीनही आरोपी हे एकमेकांशी संबंधित आहेत.
यातील पीडिता ही शाळेतून जात असताना विशाल मुंडे याने इतर दोघांसोबत तिचा पाठलाग करून तिचा व्हिडिओ व फोटो काढले. त्या नंतर रमेश नागरगोजे याने पीडिता शेतात असताना फोटो आणि व्हिडिओचा संदर्भ देत शिट्या वाजवल्या, तसेच डोळा मारला. अनिकेत घुगे हा मोबाइलवरून पीडितेला संपर्क करत होता. त्याने पीडितेच्या वडिलांच्या भ्रमणध्वनीवरून तिच्याशी संपर्क साधला.
तिच्याशी संभाषण करताना अनिकेतने ‘माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आई-वडिलांना जिवे मारीन’ अशी धमकी दिली. हा घटनाक्रम पीडितेकडून समजल्यानंतर कुशावर्ती ऊर्फ कुशाबाई हिने ‘तू पळून जाऊन लग्न कर’ असा सल्ला देत प्रोत्साहन दिले. त्यानंतर हा सर्व प्रकार पीडितेने कुटुंबीयांना सांगितला. चारही आरोपी फरार आसून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.
