ताज्या घडामोडी

केज नगरपंचायतला मिळणार नगरपरिषदेचा दर्जा मिळणार आमदार नमिता मुंदडांनी विधानसभेत केली होती मागणी

केज नगरपंचायतला मिळणार नगरपरिषदेचा दर्जा मिळणार

आमदार नमिता मुंदडांनी विधानसभेत केली होती मागणी

केज – केज शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या विचारात घेऊन ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. आता लवकरच केज नगरपंचायतला दर्जावाढ मिळून नगर परिषद अस्तित्वात येणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.

वाढत्या केज शहराला विकास निधीची कमतरता भासत असल्याने यापूर्वी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले. तरीही शहराचा झालेला भौगोलिक विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे नागरिकांची मुलभूत सोयी-सुविधांसाठी परवडच होत आहे. शहराच्या आजुअब्जुल मोठा ग्रामीण भाग असल्याने केज येथे मोठी बाजारपेठ देखील आहे. त्यामुळे वाढत्या शहराच्या सर्वांगीण आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केज नगर पंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाकडे दिला होता. त्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. आ. मुंदडा यांच्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश येऊन केज नगरपरिषद आस्तित्वात येणार असल्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून यासंबंधी जाहीर प्रगटन व नाहरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासंबधी अधिसूचना काढण्यात येऊन केज नगरपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर होणार असल्याची माहिती आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!